जनविकास बांधकाम कामगार संघटने कडून कामगार व मजुरांना सुरक्षा संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न

केज/ प्रतिनिधी: केज नगरपंचायत येथे दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी जनविकास बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरून भाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. जनविकास बांधकाम कामगार आणी इतर कामगार संघटना यांच्या वतीने बांधकाम मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तसेच ई -श्रम कार्ड व बांधकाम मजूर कार्ड यांच्या वाटपाचा केज नगरपंचायत या ठिकाणी भव्य मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. बांधकाम मजुरांना कामावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची हाणी होऊ नये, त्यांची सुरक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजूर यांना मध्यांन भोजन, सुरक्षा संच, ई-श्रम कार्ड, यांच्या माध्यमातून त्यांचा पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन निधी, लग्नासाठी साहित्य, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम मजुरांना निधी दिला जातो. आज केज नगरपंचायत येथे जनविकास बांधकाम कामगार आणी इतर कामगार संघटना बीड यांच्या वतीने केज शहर आणी ग्रामीण भागातील मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप तसेच ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

तसेच गणेशोत्सव निमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धा ठेवण्यात आले होत्या त्या मधील प्रथम, द्वितीय, व तृतीय,गणेश मंडळांना केज नगरपंचायत यांच्या वतीने पाच हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार अशा स्वरूपाचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच जावेद शेख सर यांना पी एच डी प्रदान झाल्याबद्दल, डॉ. प्रभाकर ठोके यांनी एल. एल. बी झाल्याबद्दल आणी अनिल वैरागे यांना लोकरत्न कला पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जनविकास बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरुण भाई इनामदार कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सिताताई प्रदीप बनसोड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती दिलीपराव गुळभिले, गटनेते राजू भाई इनामदार,बांधकाम संघटनेचे उपाध्यक्ष जलाल भाई इनामदार, बांधकाम संघटनेचे सचिव मोहसीन शेख,भाऊसाहेब गुंड बाळासाहेब गाढवे, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, नगरसेवक युनूस भाई शेख, डॉ. प्रभाकर ठोके, अनिल बापू वैरागे, जावेद भाई शेख,अशोकराव सोनवणे,रंजीत घाडगे, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख,

कानडीबदनचे सरपंच धोत्रा गावचे सरपंच, मिरगणे आप्पा सरपंच बाजीराव गीते, सरपंच महादेव पोळ, ढाकेफळचे सरपंच बाबुराव घाडगे व इतर मान्यवर व केज नगरपंचायत चे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने बांधकाम मजूर उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks