अवैध धंदे ची बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारावर हल्ला

अवैध धंदे ची बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारावर हल्ला

बुलढाणा चार ते पाच दिवस अगोदर वरवंड येथे जोरात चालू असलेल्या अवैध धंद्या बाबत बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची घटना 28 मे रोजी रात्री ०७:४५ वाजेच्या सुमारास पोखरी फाट्याजवळ मोरे पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावर घडली याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेल्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादोला येथील गणेश रामधन शिंदे वय 32 वर्ष साप्ताहिक जिजाऊ एक्सप्रेस चे संपादक व जिजाऊ पत्रकार असोशियन चे बुलढाणा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष यांच्यावर दिनांक 28 मे रोजी बुलढाणा येथून आपल्या गावी भादोला येथे जात असताना रात्री पावणेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पाठीमागून आवाज दिल्याने गणेश शिंदे यांनी आपली मोटारसायकल थांबवली असता.
तोंडाला रुमाल बांधूनअज्ञात तीन व्यक्तींची गाडी आली व गणेश शिंदे यांच्या गाडी जवळ येऊन थांबली व साप्ताहिक जिजाऊ एक्सप्रेस मध्ये अवैध धंदे बाबत बातमी का प्रकाशित केली.असे म्हणून त्यांनी उभ्या असलेल्या गणेश शिंदे यांच्या गाडीला लाथ मारली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली चार ते पाच दिवस अगोदर वरवंड येथील चालू असलेल्या अवैध धंद्या बाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती .याचा राग मनात ठेवून गणेश शिंदे यांच्यावर हल्ला करण्यात आला यांची तक्रार दिनांक 29 मे रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन बुलढाणा येथे देण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks