राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

बीड, दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ या देवस्थानास भेट देत त्यांनी परळी वैजनाथाचे आज दर्शन घेतले. श्री. कोश्यारी यांच्या हस्ते परळी वैजनाथास दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, श्री वैजनाथ देऊळ समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks