India Government Bats For Cricket Match On August 22 As Part Of Independence Day Celebrations, Writes To BCCI, Know Details

[ad_1]

Independence Day Celebrations : यंदा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार असल्याने देशभरात जंगी सेलिब्रेशन होणार यात शंका नाही. अशामध्ये क्रिकेटप्रेमींसाठीही एक खास पर्वणी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून बीसीसीआयला एक खास प्रपोजल पाठवण्यात आलं आहे. ज्यानुसार भारतीय क्रिकेटर्स आणि जगातील अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू यांच्यात एक खास सामना खेळवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे India vs Rest of World असा एक खास सामना यंदा रंगण्याची शक्यता आहे. आझादी का अमृत महोत्सव (Aazadi Ka Amrut Mohostav) यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत यंदा 22 ऑगस्ट रोजी हा सामना घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान बीसीसीआयच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार या मागणीबाबत सध्या विचार सुरु आहे. त्यामुळे अद्याप हा सामना होणारच अशी कोणती ठोस माहिती समोर आली नसली तरी बीसीसीआय याबाबत शक्य सर्व प्रयत्न करेल अशीही माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सरकारकडून आम्हाला असं प्रपोजल आलं आहे, या साऱ्यावर विचार सुरु आहे. पण इतक्या भव्य सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागणार आहे. तसंच India 11 विरुद्ध World 11 या सामन्यासाठी जवळपास 13 चे 14 जगातील अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू लागू शकतात, त्यामुळे या सर्वांच्या वेळापत्रकाचा विचार करावा लागेल, सर्व सोयीसुविधा पुरवाव्या लागतील. या सर्वाबाबत तयारी करावी लागणार आहे.’

‘खेळाडूंना पैसेही पुरवले जाणार’ 

बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सामना खेळवण्याची तारीख 22 ऑगस्ट असून त्याच दरम्यान इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट सामने तसंच वेस्ट इंडिजची कॅरीबियेन प्रिमियर लीगही खेळवली जाणार आहे. ज्यामुळे खेळाडूंची उपलब्धता पाहावी लागणार आहे. तसंच या सामन्यासाठी क्रिकेटर भारतात येणार असल्याने त्यांना या सर्वासाठी योग्य ती किंमत दिली जाईल.’

  

हे देखील वाचा- 

[ad_2]

Source link

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks