पंचायत समिती व दुय्यम निबंधक कार्यालय देवणी यांच्या अंदाधुंद भ्रष्टाचार बाबत देवणी पंचायत समिती कार्यालय येथे अमरण उपोषण

बीड: राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पंचायत समिती व दुय्यम निबंधक कार्यालय देवणी यांच्या अंदाधुंद कारभारा मुळे होत असलेला भ्रष्टाचार याबाबत देवणी पंचायत समिती कार्यालय येथे अमरण उपोषण करण्यात येत असून भ्रष्ट कारभाराच्या
विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक 12 8 2022 रोजी अमरण उपोषण करण्यात येत आहे.

तसेच देवणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अंधाधुंद कारभार व सर्वसाधारण जनतेची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहमदनगर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

उपोषणकर्त्यांनी जवळपास देवणी पंचायत समिती येथे वारंवार निवेदन देऊन व माहिती अधिकाराच्या खाली माहिती मागितली असली तरी या अधिकाऱ्यांनी माहिती दिले नसल्यामुळे व शेतकऱ्याच्या सर्वसाधारण माणसाच्या जे काही योजना आहेत त्या योजनेच्या नावाखाली देवणी पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांनी बेधुंद लूट केली आहे व दुय्यम निबंधक अधिकारी यांनी रजिस्ट्रीच्या नावाखाली सर्वसाधारण जनतेची एजंट मार्फत व बॉण्ड विक्रेत्याच्या मार्फत लूट करत आहेत.

यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व देवणी तालुका वासियांच्या वतीने आमरण उपोषणास बसण्यात येत आहे याबाबत सदर कार्यालयास वारंवार निवेदने व माहिती मागितली असता कुठल्याही निवेदनाची व माहितीची माहिती परत दिल्या नसल्यामुळे कंटाळून आमरण उपोषणाला बसण्यात येत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks