अन्न सुरक्षा अभियनांतर्गत माजलगाव येथे अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांचे मार्गदर्शन

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )

आझादी का अमृत महोत्सव निमित्त कालपासून म्हणजेच दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत हर घर झंडा या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याच अनुषंगाने दि. १३ तारखेला आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून संपुर्ण राज्यात ‘ सुरक्षित आहार देयी आरोग्याला आधार’ हे ब्रीद घेऊन अन्न सुरक्षा अभियान चालवण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील श्री. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी अन्न भेसळ व अन्न सुरक्षा विषयीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीड जिल्ह्याचे अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त इम्रान हाश्मी हे उपस्थित होते.
यावेळी अन्न हाताळणी बाबत व अन्न सुरक्षा या प्रमुख विषयावर हाश्मी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बाजारातील पाकीट बंद वस्तू घेताना त्यावरील अन्न परवाना क्रमांक व अन्न प्रशासनाचा शिक्का आहे की नाही याची पडताळणी करावी, त्याची मुदत कधीपर्यंत आहे हे तपासावे व नंतरच असे सामान विकत घ्यावे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर कुठेही कुणाला ही वाटले की काही सामान किंवा अन्न हे बरोबर रित्या विकले जात नाहीये किंवा ते मुदतबाह्य अन्न पदार्थांची विक्री करत आहेत अशा लोकांबद्दल अन्न व औषध प्रशासन कडे तक्रार करण्याचे सांगितले व अन्न सुरक्षा कायदा विषयीचे व होणाऱ्या कारवायांबद्दल विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अन्न सुरक्षा मित्र कुणाल दुगड यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी, रवींद्र खोडवे, उमेश थाटकर, मिलिंद वेडे, विशाल ठोसर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनत घेतली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks