जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केलेला झाडे लावण्याचा संकल्प माजलगावच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफनांनी पुर्ण केला.

निलम बाफना

माजलगाव / (वर्तमान महाराष्ट्र)
मागील २०२१ पासून माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती नीलम बाफना या त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल नेहमी चर्चेत तर असतात, तसेच आता ही त्यांनी जे काम केले आहे ते माजलगावकर कधीही विसरणार नाहीत आणि ते काम म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या संकल्पाची पूर्तता.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.५ जून रोजी झालेल्या कार्यक्रमात माजलगावच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी आपल्या कार्यालयाच्या आवारातील १० गुंठे जागेत ३००० मियावाकी वृक्षांचे घन जंगल बनविण्याचा संकल्प त्यांनी केलेला होता व तो संकल्प अगदी दोन महिन्यातच बाफना यांनी पूर्णत्वाकडे नेत आपले उद्दीष्ट पुर्ण केले. सोबतच त्या लावलेल्या रोपट्यांच्या व्यवस्थित संगोपनाची जबाबदारी घेत तेथे ठिबक सिंचनाची व्यवस्था करत पूर्ण रोपट्यांभोवती तारेचे कुंपन ही बनवले आहे. यामुळे या मियावाकी घन वनाचा काही का होईना परंतु चांगला असा फायदा पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी नक्की होणार आहे. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या या कामगिरीबद्दल संपुर्ण माजलगावकरांकडून त्यांना कौतुकाची थाप मिळत आहे.

नागरिकांनी वृक्षाचे एक तरी रोपटे आपल्या घरासमोर लावावे.

नागरिकांनी किमान एक तरी वृक्षाचे रोपटे आपल्या घरासमोर लावून त्याचे व्यवस्थित संगोपन करावे जेणेकरून भविष्यात आपल्याला कधीही ऑक्सीजन ची कमतरता भासणार नाही व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा आपला हातभार लागेल.

नीलम बाफना, उपविभागीय अधिकारी, माजलगाव.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks