जेष्ठ कवी नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांच्या काव्यवाचनाचा लाभ घ्यावा – डॉ जितीन वंजारे.

बीड प्रतिनिधि:- चळवळीतील ज्येष्ठ कवी, शाहू फुले आंबेडकरी विचाराचे विचारवंत सामान्य माणसाची परिस्थिती स्वतःच्या जिभेवर आणून ती लोकांच्या डोक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे जेष्ठ कवी नितीन चंदनशिवे उर्फ दंगलकार यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी

पत्ता:- हॉटेल विघ्नहर्ता अण्णाभाऊ साठे चौक सुभाष रोड बीड.

या ठिकाणी डॉक्टर जितिन दादा वंजारे खालापूरीकर यांनी त्यांचे सुपुत्र राजरत्न डॉ. जितिन वंजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे. बीडकरांसाठी वैचारिक पर्वणी म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी आव्हान केले आहे की कवी नितीन चंदनशिवे यांच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दर्शवावी.
शाहू,फुले,आंबेडकरी विचारांची चळवळ जपण्यासाठी शाहिरांचे,कवींचे व लेखकांचे मोठे योगदान असते. विचाराची आदान प्रदान करण्यासाठी भाषाशैली महत्त्वाची असते आणि भाषेची जपणूक करण्यासाठी कवी,लेखक, कथाकार,संपादक आणि पत्रकार इत्यादींची खूप महत्त्वाची भूमिका असते चळवळीला गतिमान करण्यासाठी, वैचारिक विकासासाठी, सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी त्यांचे सुपुत्र राजरत्न जितीन वंजारे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रम न ठेवता कवी नितीन चंदनशिवे उर्फ दंगलकार यांचे काव्यवाचन आयोजित केले आहे.

नितीन चंदनशिवे हे चळवळीतील कवी म्हणून ओळखले जातात,त्यांच्या विठ्ठला, कांबळे इत्यादी कविता खूप प्रसिद्ध असून त्यांचा दंगल हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे त्यामुळे महाराष्ट्रात लोकप्रिय कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. चळवळीला नेहमीच मार्गदर्शन करणारे नितीन चंदनशिवे यांचे बीडमध्ये दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी हॉटेल विघ्नहर्ता, अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड बीड या ठिकाणी काव्यवाचन आणि चळवळीला मार्गदर्शन अशा पद्धतीचा प्रबोधन पर कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितिनदादा वंजारे यांनी आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाला चळवळीतील वक्ते नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान यावेळी आयोजक माननीय डॉ.जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks