महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात वक्तृत्व व चित्रकला प्रदर्शन

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
येथील महात्मा ज्योतिबा फुले  विद्यालयांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित वक्तृत्व व चित्रकला प्रदर्शन कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उत्कृष्ट चित्र काढल्या बद्दल माजलगाव येथील दैनिक महाभारत चे तालुका प्रतिनिधी अमर साळवे यांचा चिरंजीव प्रसेनजीत अमर साळवे इयत्ता पाचवी याने रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करत शाळेच्या वतीने त्याचा सन्मान केला .
अभिषेक लोकुळ व समर्थ लांडे यांचा व इतर विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. प्रसेनजीत या पाचवी वर्गात शिकणाऱ्या छोट्या बालकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे उत्कृष्ट फोटो काढल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले . प्रत्येक तुकडीतून दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . या कार्यमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री.गिरी सर तर प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोताळे सर  तर कार्यक्रमाचे आयोजन व सुञसंचलन श्री. दायमा सरांनी केले याप्रसंगी चि.प्रसेनजीत साळवे, चि .अभिषेक लकुळ, चि .समर्थ लांडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे रेखाटन चित्र तयार केले होते त्यांचे यावेळी ग्रंथ भेट देऊन अभिनंदन करण्यात आले . या प्रसंगी श्री. काळे पी.आर. सरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित असणारी एक रचना विद्यार्थ्यांसाठी सादर केली याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks