वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव !

केज (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा व आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो.

यावर्षी सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील उत्कृष्ट गायक म्हणून पुणे येथील लहुराज लोंढे व निकिता चव्हाण यांना वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले संगीत क्षेत्राशी अनेक वर्षापासून निगडित असणारे लहुराज लोंढे व निकिता चव्हाण यांनी कलाक्षेत्राशी जपलेल आपलं अतूट असं नातं व आपल्या गायनातून आपल्या आवाजातून अनेक रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे असे व्यक्तिमत्व असणारे सन्मान मूर्ती यांचा गौरव दिनांक २६/१०/२०२२ रोजी वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संजीवन कोरडे सचिव अनिल वैरागी व वक्रतुंड सामाजिक प्रदेशांच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी मिलिंद लांडगे, रेश्मा लोंढे, बाळकृष्ण लोंढे ,व सुवर्णा मॅडम, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते सन्मान गौरव मिळाल्याबद्दल सर्वत्र स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks