शिरुर अनंतपाळ येथे ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना श्रद्धांजली

शिरुर अनंतपाळ येथे ज्येष्ठ साहित्यिक ना.धो .महानोर यांना श्रद्धांजली

ता. प्रतिनीधी नितेश कांबळे: शिरूर अनंतपाळ येथे प्रेमकवी गोविंद श्रीमंगल व कवयित्री सरोजा गायकवाड यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक कवी पद्मश्री ना.धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रेम कवी गोविंद श्रीमंगल यांनी ना.धो. महानोर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला रानातल्या कवीता, कथा, कादंबरी, ललित, मराठी चित्रपटांसाठी गीते, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नियुक्ती, कवीता आणि गीत रचना, अशा प्रकारचे अनेक कामी ना.धो. महानोर यांनी केल्याचे प्रतिपादन प्रेम कवी गोविंद श्रीमंगल यांनी सांगीतले आमच्या पासुन रानातली कवीता आज पोरकी झाली साहित्यिकास बांधुन ठेवनारा संवेदनशील ज्येष्ठ साहित्यिक कवी हरपला असे प्रेम कवी गोविंद श्रीमंगल म्हणाले यावेळी रमाबाई सुरयवंशी,राजाबाई कोरे,सादेव श्रीमंगल,संजय श्रीमंगल,इंस्टा स्टार हरिभाऊ डावळे, इत्यादि उपस्थीत होते

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks