शेख माजेद यांनी सलग दोन वेळेस वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवत जगात गाजवले माजलगाव शहराचे नाव

माजलगाव/(वर्तमान महाराष्ट्र)शेख माजेद यांनी गेल्या तीन वर्षांत सलग बनवले दोन वर्ल्ड रेकॉर्ड, आणि दोन दा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर चा किताब आपल्या नावावर केला . २० डिसेंबर २०२३ रोजी वर्ल्ड वाईट बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धा मध्ये वेगवेगळे देशातून ५४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या मध्ये माजलगाव येथील शेख मजेद यांनी ३० सेकंद मध्ये ८४ किक करण्याचा विश्वविक्रम करून व पुनश्च एकदा प्रथम क्रमांक मिळवुन वर्ल्ड वाईट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर चे मानकरी मिळवला.या अगोदर २०२० साली गौरव आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अकॅडमी (GISA) यांच्यातर्फे दिनांक ३० जून २०२० रोजी कोरोना काळात हे टॅलेंट दाखवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती, या मध्ये देखील रेनशी शेख माजेद यांनी कमी वेळात सर्वात जास्त किक करून ४७७ लोकांमधून त्यांनी आपले नाव सर्वप्रथम आणले, होते व बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर चे प्रथम मानकरी बनले. होते. सर्वात मोठी कामगिरी म्हणजे की त्यानी स्वतःचे नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकदा नव्हे तर चक्क दोन वेळेस नाव नोंदवले असून माजलगाव शहराचे व आपल्या बीड जिल्ह्याचेच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे देखील नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.त्याच्या या कार्याबद्दल शहरामध्ये ठीक ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे .

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks