Ind Vs Eng, 1st ODI: Virat Kohli Likely To Miss 1st ODI Against England Due To Injury Sources

[ad_1]

India vs England : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून नुकताच भारताने टी20 मालिकेत विजय मिळवला. आता भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात एकदिवसीय सामन्यांना (1st ODI) सुरुवात होणार आहे. पण तीन सामन्यांच्या या मालिकेला भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विराट दुखापतीमुळे सामना खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत असून एएनआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी आज पार पडलेल्या सरावादरम्यान विराट कोहली मैदानात दिसला नाही. कमरेच्या दुखापतीमुळे तो सराव करु शकला नसून आता यामुळेच तो उद्या पार पडणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही संघात नसण्याची दाट शक्यता आहे. पहिला सामना उद्या 5 वाजून 30 मिनिटांनी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह 

हे देखील वाचा- [ad_2]

Source link

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks