IND Vs ENG 3rd T20 Indian Team Won Series With Attacking Batting Says Captain Rohit Sharma

[ad_1]

IND vs ENG 3rd T20: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. अखेरचा सामना 17 धावांनी भारताने गमावला, पण आधीचे दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली. इंग्लंडच्या होमग्राऊंडमध्ये जाऊन भारताने मालिकाविजय मिळवल्याने सर्वत्र भारतीय संघाचं कौतुक होत असून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मालिकाविजयामागील नेमकं कारण सांगितलं आहे. भारताच्या फलंदाजांनी दाखवलेला आक्रमक खेळ फायदेशीर ठरला असं रोहितनं सांगितलं आहे.

सामन्यानंतर बोलताना रोहितने सांगितलं, ‘या मालिकेत खेळताना सर्व खेळाडूंचा दृष्टीकोन साफ होता. एक आक्रमक खेळ दाखवण्याच्या तयारीत सर्व होते. या खेळाचा आम्ही आनंदही घेतला. ही एक मोठी गोष्ट आहे, मालिकाविजयामागील हे एक मुख्य कारण आहे. यावेळी रोहितनं अखेरच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या सूर्याचंही कौतुक केलं. तो म्हणाला, “इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्य गाठण्यासाठी भारतानं चांगले प्रयत्न केले. परंतु, काही धावांनी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. आम्ही केलेल्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं चमकदार खेळी केली. तो टी-20 क्रिकेट खेळणं खूप पसंत करतो. त्याच्याजवळ उत्कृष्ट शॉट्स आहेत. जेव्हापासून तो भारतीय संघात सामील झालाय, तेव्हापासून त्याच्या खेळात दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसत आहे.”  

मालिकेत भारताचा अप्रतिम विजय

इंग्लंड विरुद्ध भारत या टी20 मालिकेत पहिल्या सामन्यापासून भारताने आक्रमक आणि दमदार खेळ दाखवला. यावेळी पहिला सामना तब्बल 50 धावांनी भारताने जिंकत आधी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सामना 49 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. पण अखेरच्या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ शकला नाही. पण मालिका भारताने जिंकली.

हे देखील वाचा- 

[ad_2]

Source link

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks