पैशांचे आमिष दाखवून तरूणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या टोळीचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे

प्रतिनिधी विशाल जयद्रथ सरवदे

लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून 20 ते 30 वयोगटातील सहा तरुणींची सुटका केली.याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे.प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय 27, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय 29, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत आरोपींविरोधात सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस रेश्मा गणपत कंक यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोणीकंद मध्ये हॉटेल मनोरा लॉजिंग बोर्डिंग अँड रेस्टॉरंट येथे तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने संबधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. हॉटेलमध्ये सहा तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली.ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव एपीआय अश्‍विनी पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोट एपीआय राजेश माळेगावे, अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, इम्रान नदाफ, ओंकार कुंभार, इरफान पठाण, रेश्मा कंक यांनी केली आहे.दरम्यान, सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्तघालण्यापासून तर खबर्‍यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks