भगवान नगर गावची अवस्था भगवान भरोसे

माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील पात्रुड येथून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेल्या भगवान नगर या गावांमध्ये १२५ ते १५० घरे असून. येथील लोकसंख्या ही अंदाजे ६००ते ७०० एवढी लोकसंख्या आहे. या गावांमध्ये मतदार हे अंदाजे ४०० ते ५०० आहेत. परंतु लोकप्रतिनिधी हे मतदान मागण्यापूर्तेच या गावांमध्ये येतात व रस्ता बनवण्याचे गाजर दाखवून नंतर परत पाच पाच वर्षे येतच नाहीत. यामुळे भगवान नगर या गावातील लोक रस्त्यापासून वंचित असून हे गाव तीस वर्षांपूर्वी वसलेले आहे. या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसून चिखलात रस्ता की, रस्त्यात चिकल आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.


याबाबत थोडक्यात वृत्त असे की, तालुक्यातील पात्रड येथून ३ कि.लो. अंतरावर भगवान नगर हे गाव वसलेले असून या गावांमध्ये दळणवळणासाठी रस्ताच राहिलेला नसून पावसाळ्यामध्ये या गावांमध्ये जाण्यासाठी किंवा गावातून येण्यासाठी चिखल तुडवत यावे लागते. भगवान नगर हे गाव पात्रुड येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असून पात्रड हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे भगवान नगर येथील गावकऱ्यांना बाजारासाठी म्हणा किंवा दैनंदिन लागणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी येथे यावे लागते. परंतु या गावाला रस्ताच नसल्यामुळे गावामध्ये दळणवळणाची साधने वाहने नेता येत नसून भगवान नगर गावातील गावकऱ्यांना पायी चालत, चिखल तुडवत, पाण्यातून वाट शोधत चालावे लागते. गावामध्ये एखादी व्यक्ती सिरीयस असल्यास किंवा डिलिव्हरी पेशंट असल्यास गावामध्ये वाहन जात नसल्यामुळे नाईजाने दवाखान्यांमध्ये आणण्यासाठी पात्रुड येथे किंवा माजलगाव येथे जाण्यासाठी पात्रुड पर्यंत बैलगाडीचा वापर करत कसे बसे पात्रुड हे गाव गाठावे लागते. यामुळे भगवान नगर गावची अवस्था ही भगवान भरोसे झालेली आहे.


या गावातील विद्यार्थी संख्याही ५० ते ६० असून माजलगाव व पात्रड येथे शिक्षणासाठी पायी चिखल तुडवत व पाण्यातून रस्ता शोधत रोज पायी चालत यावे लागते. परंतु गेंड्याची कातडी पांगरलेल्या लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला या गोष्टीचे काही सोयर सुतक राहिलेले नसून. या गावातील ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षाखाली लोकसहभागातून रस्त्यावरती स्वखर्चाने मुरूम टाकण्याचे काम केले होते. परंतु आज तागायेत लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने या गोष्टीकडे कसल्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे येथील ग्रामस्थ कोंडीराम राघू मुंडे यांना रस्त्या अभावी उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, म्हातारी आई, दोन अविवाहित मुली, व मुले असून ते ऊस तोड मजूर होते ते आजारी पडले असताना पडणाऱ्या पावसामुळे व गावामध्ये रस्ता नसल्यामुळे दळणवळणाचे साधन, वाहन येत नसल्यामुळे त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला असून. याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व प्रशासन घेईल का? असा सवाल समस्त भगवान नगर ग्रामस्थांमधून बोलला जात आहे.
यामुळेच भगवान नगर गावाला रस्ताच नसून लोकप्रतिनिधींना व प्रशासनास मात्र याचे काही देणे घेणे नसून येथील गावकऱ्यांचे जनजीवन हे भगवान भरोसे झाले आहे असे असल्याचा भास येथील गावकऱ्यांना होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks