माजलगाव येथील व्यापाऱ्यांचा प्लास्टिक बंदी बाबतच्या कारवाईला विरोध

व्यापारी संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे अशातच राज्य सरकारने ५१ माईक्रॉन पेक्षा कमीच्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी केली आहे. हा विषय व्यापाऱ्यांना मान्य आहे परंतु व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही ५१ माईक्रॉन पेक्षा जास्त जाडीचे प्लास्टिक उपलब्ध नाही. हे प्लास्टीक उपलब्ध होईपर्यंत किंवा व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय मिळेपर्यंत व्यापाऱ्यांवर प्लास्टिक वापराबाबत होणाऱ्या कारवाया थांबविण्यात याव्यात अशा स्वरूपाचे निवेदन किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने माजलगाव नगरपालिकेला देण्यात आले.

ग्राहकांना किराणा किंवा जीवनावश्यक वस्तु देतांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. व्यापार करण्यास गैरसोय होत आहे. ५१ माईक्रॉन पेक्षा जास्त जाडीचे साहीत्य उपलब्ध होत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया थांबवण्यात याव्यात असे कॅट संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोळंके म्हणाले. नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कारवाई करताना भेदभाव ठेवुन कारवाया करु नये. पर्याय उपलब्ध होण्यापुर्वी कारवाया केल्या तर व्यापारी वर्गाला बाजारपेठ बंद करावी लागेल व होणाऱ्या परिणामाची व नुकसानाची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनाद्वारे व्यापारीवर्गाकडून म्हणण्यात आले आहे. यावेळी तुषार भुतडा, अश्विन राठोड, श्रीकिसन कालिया, पंकज मालानी, दिगंबर शिंदे, अशोक गुजर, वैजनाथ यादव, राहुल खुरपे, नंदकुमार मेहता, अशोक बिक्कड, बाजीराव ताकट, संजय राऊत, पप्पू शिनगारे, कपिल पगारिया, लक्ष्मीकांत झिंजूर्के व भरपूर संख्येने व्यापरी वर्ग उपस्थित होते.

व्यापारी वर्ग हा प्रशासनास केव्हाही सहकार्य करण्यासाठी तयार असतो त्याचे उदाहरण व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन मध्ये प्रशासनास सहकार्य करून दाखवले आहे. परंतु कायद्याचा बडगा दाखवून व्यापारी वर्गात स्थानिक प्रशासन विनाकारण त्रास देत असेल तर व्यापाऱ्यांना आक्रमक आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

– संजय सोळंके, तालुकाध्यक्ष, कॅट व्यापारी संघटना.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks