शिरूर अनंतपाळ होनमाळ मार्गे साकोळ रस्ता बंद , शेतकर्यांना १५ ते २० किलोमीटर प्रवास करून शेत गाठावे लागतेय!

तालुका प्रतिनधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील लेंडी व घरणी नदीला महापुराचे स्वरूप येऊन या नदी पात्रावरून प्रवास करणाऱ्या शेकडो शेतक-यांचा आपल्या शेताकडे जाण्यासाठी जवळच्या असलेल्या 3 ते 4 किलोमीटरचा मार्ग बंद झाल्यामुळे शेतक-यांचा शेतीचा संपर्क तुटलेला असून शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी आता 15 ते 20 किलोमीटर दूरवरून जावे लागत आहे.

तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या साकोळ गावातून दोन मोठे पात्र असलेल्या नदया असून या दोन्ही नदयावरून दररोज शेतकरी आपल्या शेताकडे जात असतात परंतू गेल्या दोन चार दिवसांपासून सततच्या पावसाने या दोन्ही नदया दुथडी भरुन वाहत आहेत.

सदर नदयावरू माळवाट, उजेड वाट, तसेच अजनी येथील काही शेतकरी या वाटेचा वापर करित असतात पण सततच्या पावसाने तसेच मांजरा नदीवरील बॅरेजमुळे या भागातील नदया बारा महिने पूर्ण क्षमतेने भरून राहिल्यामुळे या नदयावरून शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी दररोज ३ ते ४ किलोमीटर जवळच्या रस्त्याऐवजी या नद्यांमुळे २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या शेतात जावे लागत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

सध्या सोयाबीन काढणीचे दिवस असून शेतकरी व मजुरांना शेतीकडे जाण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. तरी शासनाच्या संबधीत विभागाकडून सदरील नद्यांची जातीनिहाय पाहाणी करून या नदिवर पूल बांधून दयावा अशी मागणी साकोळच्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks