अटकेतील आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

हडपसर: अटकेतील आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरून नेलेले ४,३८,०००/- रूपये किंमतीचे ७८ ग्रॅम २७० मि. ग्रॅम वजनाचे दागिने केले हस्तगत

फिर्यादी हे दिनांक १२/०२/२०२४ रोजी दुपारी ०३/०० वाजताच्या सुमारास त्यांचे ससाणेनगर येथील राहते घर कुलुप लावून बंद करून मुळगावी सांगली येथे गेले होते. त्यानंतर दिनांक १३/०२/२०२४ रोजी पहाटे ०४/०० वा.चे सुमारास फिर्यादी यांचे शेजारच्यांनी फिर्यादी यांचे घरात घरफोडी झाल्याचे कळविले. त्यावरून फिर्यादी यांनी त्यांचे घरी येवून, घराची पाहणी करून त्याबाबत अज्ञात इसमा विरूध्द तक्रार दिल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.२८१/२०२४ भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचे तपासादरम्यान हडपसर पोलीस ठाणेकडील वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीस अटकेत असलेला आरोपी नामे निहालसिंग मन्नुसिंग टाक ऊर्फ शिखलकर, वय १९ वर्ष, रा. स.नं.४. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ हडपसर, पुणे याचेकडे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संतोष पांढरे, यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे हडपसर तपास पथकाने विश्वासात घेवून कौशल्याने अटक मुदतीत तपास केला असता, आरोपीने वरील दाखल गुन्हा त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. अधिक तपासादरम्यान त्याने गुन्ह्यातील चोरून नेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ७८ ग्रॅम २७० मि.ग्रॅम वजनाचे, किं. रू ४,३८,०००/- चे सोन्याचे दागिने काढून दिल्याने ते गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पो. निरीक्षक प्रविण अब्दागिरे, हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. आर. राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संतोष पांढरे, पोनि (गुन्हे), मंगल मोढवे, पोनि (गुन्हे) उमेश गित्ते, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पो. निरी. अर्जुन कुदळे, प्रविण अब्दागिरे, पो. उप निरी. महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks