जोगाळा येथे घरफोड्या दान पेटी सह रस्त्यावरून जाणाऱ्यांची ही लूटमार सुरू; पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका

मंदिरातील दान पेटी फोडून त्यात जमलेले लाखो रुपयो, सोने, चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले.

तालुका प्रतनिधी लातूर: जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ जोगाळा येथे गेल्या दीड महिन्यापासून दोन ठिकाणच्या घरफोड्या , अंबिका मातेच्या मंदिराची दानपेटीसह रस्त्यावरून जाणाऱ्यांची लूटमारी सुरुच असून या बाबीकडे पोलीस मात्र लक्ष देत नसल्याने चित्र पाहायला मिळत आहे.

जोगाळा येथे गेल्या दीड महिन्यात अंबिका देवी मातेच्या मंदिरातील दान पेटी फोडून त्यात जमलेले लाखो रुपयो , सोने , चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले. तसेच शेषेराव माने यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला , त्याचबरोबर अंकुश हंकारले यांच्याही घरी चोरी झाली तर रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जोगाळा पाटी जोगाळा गावाकडे झाडू, फड्डे विक्री करून परतत असलेल्या महिलेला तोंड दाबून तिच्याकडेचे पैसे घेवून चोरटा फरार झाला . अशा विविध घटनामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी एकाही व्यक्तीने पोलीसाची मदत घेण्याची हिमंत केली नाही . याचे कारण पोलीस उलट त्रास देत आहे . अशी भावना ग्रामस्थांची तयार झाली असून या संपूर्ण बाबीकडे वरिष्ठ पोलीसांनी तपास करून तालुक्यात होत असलेल्या अशा घटनाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्था कडून केली जात आहे .वर्तमान महाराष्ट्र न्यूज साठी नितेश कांबळे शिरूर अनंतपाळ, लातूर

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks