न्यायाधीशांच्या गाडीला ट्रकची जबर धडक.! दोघांचा जागीच मृत्यू तर ट्रक चालक फरार…

तालुका प्रतनिधी नितेश कांबळे: दि. ११ लातूर – अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाटा येथे रात्रीच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घटणेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघातात मृत पावलेले एक जन बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. तर शनिवार – रविवार सुट्टी असल्याने, ते आपल्या गावाकडे रेणापूर – उदगीर मार्गावरून शुक्रवारी जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघात एवढा भीषण होता की, वाहनाचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. उद्धव वसंत पाटील मृत न्यायाधीश यांचे असून ते सध्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन न्यायालय बीड येथे कार्यरत होते. ते मूळचे चाकूर तालुक्यातील आनसोंडा या गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वाहन चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांचा देखील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

न्यायाधीश उद्धव पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks