पत्रकार प्रा.रणजित इंगळेच्या मारेकर्याना तात्काळ अटक करून ५० लाखांची आर्थिक मदत करा – पत्रकार संघटनेची मागणी

१७ जुन रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती कडून डोक्यात लोखंडी रॉड घालून निर्घृण हत्या

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
अकोला येेथील दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. रणजित देवराव इंगळे यांच्या मारेकऱ्याना तात्काळ अटक करा, व इंगळे कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत करा असा मागणीचे निवेदन पत्रकाराच्या वतीने
माजलगाव येथील तहसीलदार यांना सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.दोन्हीं ही पायांनी दिव्यांग असलेले प्रा रणजित इंगळे ह्यांची १७ जुन रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती कडून डोक्यात लोखंडी रॉड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे.तसेच अकोल्यातील पत्रकाराची कन्या मुंबईला उच्च शिक्षण घेत असताना तिच्यावर देखील बलात्कार करून
तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला आहे, दोन्हीं ही घटना अत्यंत भयानक आहेत तरी शासनाने ५० लाखांची आर्थिक
मदत करावी. तसेच पत्रकार प्रा.इंगळे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आरोपीला त्वरित अटक
करावे असे निवेदनात म्हटले आहे तसेच
राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व
असलेल्या जिल्ह्यात १७ जून रोजीरात्री दिव्यांग पत्रकार प्रा. रणजित इंगळे यांची हत्या करण्यात आली. अजुन आरोपी अटक नाही, आरोपीला अटक करावी तसेच पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची तातडीने मदत करावी, तालुक्यांतील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने
महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर हरिष यादव, तुकाराम बापू येवले,महेंद्र म्हस्के,तानाजी सिरसट, सुभाष बोराडे, (दै सम्राट प्रतिनिधी) अरविंद ओव्हाळ, किशोर प्रधान, विष्णू (दादा) उगले, दर्शन डोंगरे, राजरत्न डोंगरे, अमर साळवे, प्रा. सुदर्शन स्वामी, उमेश जेथलीया, रविकांत उघडे, पृथ्वीराज निर्मळ, विजय डावरे, विजय म्हस्के, किसन भदर्गे, ,इत्यादी पत्रकार बांधव यांच्या सह्या आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks