रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी, बोपोडी मधील घटना; रिक्षाचालकाला अटक

रिक्षाच्या भाड्यावरुन वाद घालत एका रिक्षाचालकाने प्रवाशाला फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना बोपोडी येथे घडली आहे.याप्रकरणी रिक्षाचालकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.११) दुपारी चारच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी बस स्टॉपजवळ घडला.याबाबत बाळासाहेब पोपट झोडगे (वय-५६ रा. एलआयसी कॉलनी, औंध रोड, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (खडकी पोलीस स्टेशन) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक साजिद मोहंमद बागवान (वय-३० रा. अशोक भोईटे नगर, बोपोडी, पुणे) याच्यावर आयपीसी ३२४, ३२३, ५०४नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झोडगे यांना बोपोडी मेट्रो स्टेशन येथून एलआयसी कॉलनी औंध रोड येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आरोपी साजिद याला रिक्षाबाबत विचारणा करुन भाडे किती घेणार अशी विचारणा केली. त्यावेळी साजिद बागवान याने एलआयसी कॉलनी पर्य़ंत 90 रुपये रिक्षाचे भाडे सांगितले. त्यावेळी फिर्य़ादी यांनी एलआयसी कॉलनी पर्यंत ५० रुपये भाडे होत असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने रिक्षाचालक साजिद याने फिर्यादी यांच्यासोबत आरेरावी करत त्यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना धक्का मारुन खाली पाडून त्याठिकाणी पडलेल्या फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks