माजलगावात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

माजलगावात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ)
लोकमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती माजलगाव शहरांमध्ये विविध ठिकाणी पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी माजलगाव धरणाच्या कमानी जवळ राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौकामध्ये दिनांक ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. प्रकाशराव गवते, माजी उपाध्यक्ष तुकाराम येवले, रा.स.प.चे तालुकाध्यक्ष कल्याणराव गवते. प्रसिद्ध व्याख्याते बाळासाहेब सोनसळे. ओ.बी.सी. महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाने, युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष संतोष देवकते, सराफ संघटनेचे उपाध्यक्ष नारायण सातपुते, भागवत गायकवाड, अविनाश कांडुरे, उपसरपंच राज अर्जुन, खानापूर चे सरपंच शंकर आबुज, विशाल देवकते, मुक्ती राम आबुज, आप्पासाहेब तायडे, विनायक सरवदे, पंकज कुमार साळवे, प्रभाकर साळवे, हनुमान सरवदे, शिवाजी अबुज, अशोक मस्के, पोलीस कर्मचारी ठेंगल, तोटावाढ आदी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks