स्पर्धा परिक्षेत यशप्राप्तीकरीता संयम व सातत्य आवश्यक- क्षितीज मोगरेकर

एमपीएससी परिक्षेतील यशाबद्दल सत्कार

माजलगाव/ (प्रतिनिधी)
स्पर्धा परिक्षेत यशप्राप्तीकरीता संयम व सातत्य आवश्यक असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन आपले करिअर घडवावे असे आवाहन क्षितीज मोगरेकर यांनी केले. महाराष्ट् लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्री. मोगरेकर यांनी यश मिळविल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात ता. ३१ जानेवारी रोजी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी अनंतशास्त्री जोशी हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड. भानुदास डक, तुकाराम येवले, उमेश मोगरेकर, वृषाली डक यांची उपस्थिती होती. बोलतांना श्री. मोगरेकर म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी अभियांत्रीकीची शिक्षण पुर्ण केले होते. अभियंता झाल्यानंतर कंपनीत नौकरी करण्यापेक्षा शासकीय सेवेत काम करण्याची जिद्द ठेवली. नुकत्याच जाहिर झालेल्या १८८ वा रॅंक मिळाला असुन यामध्ये आई – वडिल, भाऊ, वहिणी यांचेसह गुरूजनांचे मोठे प्रोत्साहन मिळाले. यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो. स्पर्धा परिक्षेत यशप्राप्तीकरीता संयम व सातत्य आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी बोलतांना ॲड. डक म्हणाले की, क्षितीज मोगरेकर यांनी मिळवलेले यश हे अव्दितीय आहे तर तुकाराम येवले म्हणाले की, ग्रामीण भागात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. क्षितीजने मिळविलेले यश हे निश्चीतच क्षितीजाला गवसणी घालणारे असल्याचे सांगीतले. उमेश मोगरेकर म्हणाले की, क्षितीजने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता कठोर परिश्रम घेत मिळवलेले यश हे मोगरेकर कुटूंबीयांसाठी आनंददायी आहे. अनंतशास्त्री जोशी म्हणाले की, क्षितीज मोगेरकर यांनी मिळविलेले यश हे युवा पिढीसाठी निश्चीतच प्रेरणदायी असुन आगामी काळात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न निश्चीतच पुर्णत्वास नेशील असा विश्वास व्यक्त केला. सुत्रसंचालन कमलेश जाब्रस यांनी तर आभार रमेश गिरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लॉकडाउन ग्रुप, सातत्य ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

सातत्य कोचिंग क्लासेसचा विद्याथी चमकला
येथील सातत्य कोचिंग क्लासेसच्या माध्यमातुन पाचवी ते दहावीपर्यंत क्षितीज मोगरेकर याने शिक्षण घेतले होते. सातत्यच्या संस्कारावर व जडणघडणीतुनच हे यश संपादन केल्याचे क्षितीज याने सांगीतले असुन सिध्देश्वर विद्यालयात त्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झालेले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks