नारायण दादा काळदाते यांच्या स्मारणार्थ पहिले विद्यार्थी कवी संमेलन हर्ष उल्हासत संपन्न

“राखावी बहुतरांचे अंतरे भाग्य येथे तंत नंतर रे” या ब्रीद वाक्यप्रमाने नारायण दादा काळदाते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे

केज प्रतिनिधि: तालुक्यातल्या बनसारोळा गावातील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विध्यालयात विध्यार्थ्यां कवि समेलन संपन्न झाले. शिक्षणाची माहेर घर म्हणून महाराष्ट्र विध्यालया बनसारोळा गावची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळख आहे. गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांचा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. बनसारोळा व परिसरातील दीनदुबळया कुटुंबातील विद्यार्थीना शिक्षणाच्या प्रवाहात आनणारे स्वर्गीय नारायण दादा काळदाते.बनेश्वर शिक्षण संस्था सचंलित महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा, होळश्वर विद्यालय, होळ सानेगुरुजी विध्यालय भावठाणा व मोरेवाडी आशा चार शाखा नारायण दादा काळदाते यांनी निर्माण केल्या होत्या.

नारायण दादा काळदाते याचां स्वभाव सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करणारा त्याचा स्वभाव आहे. ज्यादिवशी बनेश्वर शिक्षण संस्थाच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना जेवण मिळत नसेल अशा वेळेस नारायण दादाला समजलं तर ते ही विद्यार्त्या सोबत उपाशी राहत आसत. दलित मित्र पुरस्कारानी नारायण दादा काळदाते म्हणून ही दादाची ओळख सपुंर्ण महाराष्ट्र होती .
या कवि समेलनाचे भागवत दादा गोरे, प्रमुख उपस्थिती डॉ. नरेंद्र काळे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवि दगडू दादा लोमटे तसेच प्राध्यापक भगवान शिंदे, भागवत मसने ज्येष्ठ कवि.या कवि समेलनासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक हाडीबांग सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ धायगुडे सर यांनी केले तर यावेळी उपस्थित केशव काकडे सर, दत्ता काकडे सर, तानाजी जोगदंड सर, रंगनाथ काकडे सर ईतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks