बनसारोळा गावचे भुमिपुत्र अविनाश धायगुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशउपाध्यक्ष पदी निवड

केज तालुक्यातील बनसारोळा गावचे भुमिपुत्र अविनाश धायगुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युववक प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. एक सर्व सामान्य कार्यकर्ते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अविनाश धायगुडे यांचा प्रवास अतिशय खंडतर प्रवास आहे. घरची परिस्थिती अतिशय नाजुक त्यातुनच शेती थोडी याच शेतीवर आपल्या कुटुंबाची उपजिविका .परिस्थितीला दोष न देता छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर फुलें शाहु आंबेडकर यांच्या विचार घेवुन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावात व प्रत्येक शहरात व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावुन सर्वसामान्य नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी आतोनात प्रयत्न करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार नेतृत्व म्हणजे अविनाश धायगुडे होय.

तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे अविनाश धायगुडे होय.विधानसभा जिल्हा परिषद सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या काळात स्टार प्रचाराक म्हणून काम करणारे अविनाश धायगुडे होय.एक शेतकरी पुत्र म्हणून देखील अविनाश धायगुडे याची एक वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतमजूर गोरगरीब कष्टकरी समाजाच्या सोडविण्यासाठी ही परिश्रम घेणाऱ्या नेतृत्व म्हणजे अविनाश धायगुडे होय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते अविनाश धायगुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी सर्वानमते निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्व पातळीतुन अभिनंदन होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks