भारतीय जनता पार्टीच्या माजलगाव विधानसभेच्या प्रमुख पदी मोहनराव जगताप यांची निवड

मोहनराव जगताप यांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून सत्कार

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा व विधानसभा प्रमुखांची निवड दि.८ गुरुवार रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले असून माजलगाव विधानसभा प्रमुख पदी भारतीय जनता पक्षाचे नेते मोहनराव जगताप यांची निवड करण्यात आली.आगामी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे पद महत्त्वाचे समजले जाते.
गुरुवार रोजी महाराष्ट्र भाजपने मोहनराव जगताप यांची निवड जाहीर करताच माजलगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक माजलगाव येथे फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच मोहनराव जगताप यांचा गुरुवार रोजी भारतीय जनता पार्टी माजलगावच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभावेळी मोहनराव जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी व बळकटीसाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी होणाऱ्या लोकसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. प्रकाश आनंदगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, भाजप नेते ज्ञानेश्वर मेंडके, संचालक संतोषराव यादव, भाजप नेते बबबनराव सिरसट, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, भाजपा भटकेविमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव अलकुंटे होते. प्रस्ताविक शरद यादव व सूत्रसंचालन अँड. जयराम सजगणे यांनी केले. या कार्यक्रमाला राहूल जगताप, जगदीशराव बादाडे, माजी जि. प. सदस्य सुदाम आगे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, कृ. उ. बा. समितीचे संचालक भगवानराव आगे, पं. स. सदस्य पंडीत काळे, सरपंच नारायण भले,भालचंद्र सोळंके अजय शिंदे, रामेश्वर चाळक, मारुती विटेकर, माजी सरपंच अविनाश गोंडे, पांडुरंगराव झोडगे, मा.सरपंच दत्ता चव्हान, उपसरपंच गणेशराव शेंडगे, रमेश झोडगे, राज अर्जुन, राधे कांबळे, मा. नगरसेवक अमोल सोळंके, ईश्वर होके, राम जगताप, डॉ. कैलास काठवडे, फिरोज इनामदार,शंकर शेंडगे, कल्याण जाधव,सर्जेराव शिंदे,अँड.रामेश्वर शेजुळ, प्रकाश चव्हाण, लक्ष्मण सरगर, बाळासाहेब करांडे, दीपक अलकुंटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks