येरोळ सह विविध गावात आनंदाचे शिधा वाटप भाजपाचे ता.अध्यक्ष मगेंश पाटील यांच्या हस्ते झाले.

प्रतिनिधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा शिधा येरोळ येथील शासनाच्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून पात्र शिधाधारकांना भाजपाचे तालुका अध्यक्ष मगेंश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी १ किलो आणि पामतेल याचा समावेश असून हे किट फक्त शंभर रुपये या नाममात्र दरात लाभार्थ्यांना दिले जात आहे. शाम सिंदाळकर आणि नारायण नाळापुरे यांच्या सरकार मान्य स्वस्त धान्य रेशन दुकानात रविवारी या उपक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी उपसरपंच सतिस सिंदाळकर, जेष्ट नागरिक गोविंद पोतदार, प्रभाकर पालकर, माजी सभापती शामराव सिंदाळकर, एल.जी.लोंढे , हानमंत पालकर, पुंडलिक बस्पुरे, रवि पाटील, ओमप्रकाश तांबोळकर, आमर पाटील , हाबीब पठाण यांच्या हस्ते पात्र शिधाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला. या रेशन दुकानाच्या अंतर्गत एकूण ११२१ शिधाधारकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती नायब तहसिलदार पञीके यांनी दिली. याप्रसंगी पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks