अवकाळी पावसातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – रमेशराव आडसकर

अवकाळी पावसातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा — रमेशराव आडसकर

माजलगाव /(पृथ्वीराज निर्मळ)
तालुक्यात दिनांक २६ रोजी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा नेते रमेश आडसकर यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेली पीक नष्ट होत आहे अगोदरच शेतकरी विविध संकटांनी त्रासला असताना पुन्हा अवकाळी मुळे शेतकऱ्यांना मोठी मार पडली आहे झालेल्या अवकाळी पावसात फळबाग कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे नुकसान झालेले आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्वारे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यात यावा अशी मागणी भाजप नेते रमेश आडसकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याकडे करण्यात आली असून अरुण राऊत, बबनराव सोळंके, ईश्वर खुर्पे, ॲड. सुरेश दळवे, अनंत शेंडगे, लतीफ नाईक, माऊली सरवदे, हनुमान कदम, विनायक रत्नपारखी, जयराम गायकवाड, अन्सर शेख , अनंत जगताप, दाजी सोळंके, दत्ता महाजन, सतीश जोशी, अनंत यादव,विठ्ठल जाधव, विलास लाटे, ज्ञानेश्वर जाधव,ईश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks