केज तालुक्यातील बनसारोळा गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बळीराजा प्रतिमेचे पुजन!

तालुका प्रतिनिधी: केज तालुक्यातील बनसारोळा गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बळीराजा प्रतिमेचे पुजन राजश्री जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी बोलताना बाळासाहेब जाधव म्हणाले दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळतांना, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’

असे म्हणतात. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा, या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते.

नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. घराघरात बलिपूजन केले जाते. आसे ते म्हणाले यावेळी

उपस्थित बनसारोळा गावातील सामाजिक कार्यकर्ते शुभम गोरे, सुग्रीव जोगदंड, अक्षय जोगदंड राजाभाऊ गोरे अक्षय जोगदंड, ज्ञानेश्वर रोकडे, आश्रुबा राऊत, अजित पवार, बप्पा गोरमाली, बापू गोरमाळी, शकंर जोगदंड, आशोक जोगदंड, बापु कावळे, बावकर दादा, किशोर जोगदंड, रमाकांत गोरे सर, तसेच बनसारोळा गावचे तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks