तथागत गौतम बुद्धांनी बहुजन समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला – विजय साळवे

राजगृह येथे बुद्ध जयंती निमित्त बोलताना त्यांनी सांगितले..

माजलगाव – ( पृथ्वीराज निर्मळ ) विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूल मंत्र समस्त मानव जातीला सांगून जगाचा उद्धार केला असे प्रतिपादन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी व्यक्त केले . राजगृह येथे बुद्ध जयंती निमित्त बोलताना त्यांनी सांगितले की, शाक्य कुळातील राजघराण्याचे राजकुमार सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग करून राजवैभव सुख-समृद्धी सोडून सत्याचा शोध घेण्यासाठी दुःखाचे कारण शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केले व आपल्या बुद्धीच्या जोरावर जगाचा उद्धार केला.

बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूळमंत्र समस्त मानव जातीला सांगून पहिले प्रवचन पाच ब्राह्मण भंतेना दिले तसेच न्हावी जातीच्या भंते उपाली यांना धम्मदीक्षा देऊन सर्व जाती पंथ यांच्या लोकांना बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान सांगून त्यांचा उद्धार करून सुखी जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. बुद्धांचे विचार जगातील कोणत्याही व्यक्तीने जर आचरणात आणले तर तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.

पुढे बोलतांना विजय साळवे म्हणाले भगवान बुद्ध हे स्वतः क्षत्रिय राजे असून त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग शोधला व बहुजन दलित आदिवासी मागासवर्गीय एवढेच नव्हे तर ब्राह्मण क्षत्रिय राजे – महाराजे यांनी सुद्धा बुद्धाची शिकवण व त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारून जगातील महान सम्राट राजा अशोकाने त्यांचे अनुकरण करून बौद्ध धर्म वाढविण्याचे काम केलेले आहे. समाजाला मुक्तीचा संदेश दिला.

असे प्रतिपादन विजय साळवे यांनी बुद्ध जयंती निमित्य केले. याप्रसंगी माजी बांधकाम सभापती राजेश साळवे, अंजेराम घनघाव, पंडित ओव्हाळ, ओमप्रकाश टाकणखार, विश्वनाथ तोडके, वशिष्ठ लांडगे, बाळू साळवे, अतुल भदर्गे, वैजनाथ गडसिंग, राजू किर्ते, अशोक निकाळजे, महादू चांदमारे, बाळासाहेब भालेराव, बाळू तुपारे आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks