बनसारोळा गावात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्साहात साजरी

केज / प्रतिनिधी
तालुक्यातील बनसारोळा गावात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जंयती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वी जयंतीनिमित्त बनसारोळा गावचे सेवा सोसायटीचे चेअरमन मा. दगडू रामभाऊ गोरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष जोगदंड यांनी केले यावेळी ते बोलताना म्हणाले की अण्णा भाऊचे कार्य हे प्रत्येक व्यक्तीच्या मना मनावर अण्णाभाऊचे कार्य आहे. ते पुढे म्हणाले अण्णाभाऊ आपल्या शाहीरीतुन म्हणायचे की जग बद्दल घालुनी घाव मज सागुनी गेले भिमराव अण्णाभाऊचे कार्य व विचार हे आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरणारे आहेत.

अण्णाभाऊ हे फक्त दीड दिवस शिक्षण घेणारे महापुरुष म्हणून सर्वांना परिचित आहेत. दीड दिवसाचे शिक्षण घेवुन शाहीरीच्या व साहित्याच्या जोरावर सपुंर्ण जगात नाव कमवणारे असून मातंग समाजातील युवकांनी अण्णा भाऊचे विचार डोळ्यासमोर ठेवुन कार्य करावे . यावेळी बनसारोळा गावचे माजी सरपंच युवराज काका काकडे, युवराज दादा गोरे, आशोक अप्पा काकडे, पचांयत समिती सदस्य तानाजी जोगदंड, माजी जिल्हा परिषद सदस्य आशोक गायकवाड, बनसारोळा ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी मधुकर माने, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गायकवाड, कृष्णा गोरेमाळी, सतिष गोरे, बनसारोळा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी तंटामुक्ती बालासाहेब काकडे दादा, सामाजिक कार्यकर्ते जयचंद धायगुडे, सुग्रीव जोगदंड, धनंजय जोगदंड, आशोक जोगदंड, अतिनंद काबंळे, वैजनाथ जोगदंड, तुकाराम पाचांळ, निलेश पवार, रजनीकांत गायकवाड, राजपाल काकडे, आजय काळे, नदंकुमार कावळे, महेश शिंदे, आदर्श माध्यमिक विध्यालयाचे शिक्षक मादंळे, मेश्राम, मस्के,पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार व अन्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks