सरोजा गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्षाच्या वतीने नुतन जिल्हा उपसंघटिका

तालुका प्रतनिधी नितेश कांबळे:

शिरूर अनंतपाळ येथे श्रीमती सरोजा गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला शिरुर अनंतपाळ येथील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नुतन जिल्हा उपसंघटिका श्रीमती सरोजा गायकवाड यांचा वाढदिवस शिरूर अनंतपाळ शहरामध्ये विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिरुर अनंतपाळ शहरातील उर्दू शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण करण्यात आले या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळी गायकवाड म्हणाल्या मा जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेबांनी मला दिलेली जबाबदारी सार्थ पणे पार पाडणार मातोश्रीच्या आशीर्वादाने मी आज लातुर जिल्हा उपसंघटिका झाले वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे आम्ही विसरणार नाही मी कायम त्यांच्या सोबत रहानार कितीही अडचणी आल्या तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत रहानार आमच्या नेस्ट नेत्या शोभाताई बेंजरगे व माझे मार्गदर्शक कवी गोविंद श्रीमंगल शिरुर अनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे यांच्या सुचने प्रमाने पक्ष बांधणीसाठी जुन्या व नव्या शिवसैनिकांना सोबत घेऊन मी काम करेन पुर्वी प्रमाणे शिवसेनेचे दिवस आणण्यासाठी आता सर्वांनी जोमात कामाला लागावे सर्वांना विश्वासात घेऊन पक्षात स्थान दिले जाईल असे मार्गदर्शन श्रीमती सरोजा गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यकर्त्यासी मार्गदर्शन केले तसेच मी आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असेही त्या म्हणाल्या यावेळी जेष्ठ पत्रकार महेताब शेख, शिवसैनिक सुदर्शन धुळे, कवी गोविंद श्रीमंगल व असंख्य शिवसैनिक उपस्थीत होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks