अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षा 2023-2024 मध्ये संस्कार अविनाश सुर्यवंशी 84% गुण घेऊन लातुर जिल्ह्यात प्रथम

लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जि.प्र. प्रा. शाळा शिवपूर येथील विद्यार्थी इयत्ता दुसरी या वर्गातील अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षा 2023-2024 मध्ये संस्कार अविनाश सुर्यवंशी 84% गुण घेऊन लातुर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे जि. प्र. प्रा. शाळा शिवपूर येथील विविध स्पर्धा परिक्षेच्या सहभागी करून विध्यार्थाना मार्गदर्शन करणारे अतिशय चांगल्या प्रकारे विध्यार्थ्यांना घडवणारे सतत वेळो वेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक कांचनकुमार कलवले तसेच मोबाइल चालु असुन त्यांना मोबाईलपासून दुर ठेऊन खराब झाला असे सांगून अभ्यास करून घेणारे आई वडील आजी आजोबा यांचा खुप मोलाचा वाटा आहे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशोक लवांडे उपाध्यक्ष नितेश कांबळे शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सिंदाळकर साहेब येलमटे सर वाघमारे सर शिंदे सर देवरसे सर यांनी संस्कार अविनाश सुर्यवंशी यांच कौतूक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

नितेश कांबळे

Top
Enable Notifications OK No thanks