अवकाळी पावसाचा कहर..ज्वारी, कोथिंबीर, फळबाग पिकांना फटका

गोठयावर विज कोसळल्याने गोठयातील दोन गाई,एक म्हैस, तीन बकरे आणि वीस कोंबड्या जळुन खाक हाडगा येथील दुर्देवी घटना

काळजाला चटका लावणारे चित्र

निलंगा/महेश शेळके – सध्या अवकाळी पावसाने कहर केलेला असुन शेती पिकासह पशुधनासाठी हा अवकाळी पाऊस हानिकारक ठरला. निलंगा तालुक्यातील हाडगा,वडगाव, तुपडी, आनंदवाडी, आंबेगाव,शेडोळ, शिवणी कोतल परिसरातील ज्वारीचे पिक भुईसपाट झाले तर फळबाग पिकांना मोठा फटका बसला असुन यासोबतच भाजीपाला वर्गीय कोथिंबीर पिकांची झाली नासाडी. सरते शेवटी शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान न भरून येणारे झाले असुन याच सोबत आता पशुधनांचाही फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.
दि.27 रोजी रात्री विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात हाडगा येथील शेतकरी गहिनीनाथ जाधव यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. दुर्देवाने या घटनेत जाधव यांच्या गोठ्यासह गोठ्यातील तीन बकरे, दोन गाई, एक म्हैस आणि वीस कोंबड्या जळून खाक झाल्या. यामुळे शेतकऱ्याचे न भरून येणारे लाखो रूपयाचे मोठे नुकसान झाले.
या सोबतच शिवणी कोतल येथे कोथींबीर पिकांची पेरणी सर्वाधिक झालेली असुन अवकाळी पावसाचा फटका कोथिंबीर पिकांना झालेला असुन संपूर्ण कोथिंबीर पिक आता सडण्याच्या खराब होण्याच्या मार्गावर आहे. आता यांच्या पदरात घातलेला खर्च हि निघणार नाही.यामुळे शेतकरी चागलाच अडचणीत सापडला आहे. तसेच फळबाग,भाजीपाला आणि ज्वारी पिकांना या अवकाळी चा फटका बसला असुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks