आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाची बैठक संपन्न

मानवी समाजाच्या कल्याणाप्रती मानवाधिकार व जागरूकता आणण्याचा सदैव प्रयत्न करणार – शेख शाकेर (आ.मा.म.रा.महासचिव)

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ)
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघ माजलगांवच्या वतीने दि. ०२ मे २०२३ रोजी येथील शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे बैठक घेण्यात आली व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघ (HRIF) चे राष्ट्रीय महासचिव शेख शाकेर यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन दि. २ मे रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १ वा. करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेराज पठाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश कांडुरे, आब्दुल मुक्तदिर हे होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघ (HRIF) चे राष्ट्रीय महासचिव शेख शाकेर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आली. यामध्ये अविनाश कांडुरे यांची मराठवाडा अध्यक्ष पदि व राहुल सोनगुडे पाटील मराठवाडा समन्वयक , अब्दुल मुक्तदिर परभणी जिल्हाध्यक्ष, शेख एजाज नवाज (बीड जिल्हा उपाध्यक्ष) शौकत गफ्फार शेख (बीड जिल्हा समन्वयक) इरफान सत्तार बेग (माजलगाव तालुका अध्यक्ष) यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव शेख शाकेर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना म्हणाले की, मानवी समाज कल्याणाप्रती मानवाधिकार जागरूकता आणण्याचा मी सदैव प्रयत्न करणार आहे. सामान्य लोक किंवा समाजाला मानवाधिकाराची संपूर्ण माहिती उपलब्ध करणे आणि भारतीय समाजामध्ये मानवाधिकाराचे ज्ञान वाढवणे व पुरवणे हे आमचे ध्येय धोरण आहे. तसेच भारत सरकारद्वारे मानवाधिकार संरक्षण अधिनियम जनमानसात प्रचार व प्रसार करणे. यासाठी सामान्य माणसाला याचा लाभ किंवा फायदा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग राज्य मानवाधिकार आयोग यामध्ये गठित मानवाधिकार आयोगाच्या संपर्कात राहून सर्वसामान्य लोकांना सुविधा पुरवण्याचे काम तसेच प्रयत्न आम्ही करणार आहोत. समाजातील विविध वर्गातील अत्याचारीत जनसामान्य लोकांना हेतू पुरत्सरपणे शासन, प्रशासन, न्यायालय किंवा अन्य ठिकाणी लोकांना न्याय मिळत नसेल तर त्या ठिकानी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक जीवाने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. आणि मानवाधिकाराचे हनन करणाऱ्या ताकतीविरुद्ध सतत संघर्ष करण्यात येईल. मानवा – मानवा मध्ये कटूता मतभेद, हिंसा , वैमनस्य, तिरस्काराचे वातावरण संपुष्टात आणून आपापसामध्ये शांतीचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमच्या संघटणेच्या माध्यमातून आम्ही करत राहणार आहोत.
या माध्यमातून स्वच्छ व पारदर्शक आचरण ठेवत वेळोवेळी समाजाला कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊ. कारण की लोकांचे आचरण किंवा त्यामध्ये तारतम्य प्रस्थापित व्हायला हवे. आपणास अनुरोध आहे की, आपले सगळे सोबती, मित्र हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाशी जोडले गेले तर दुसरे लोक पण जोडले जातील. यामुळे गोरगरीब जनतेचा फायदा होऊ शकतो असे त्यांनी कार्यक्रमात संबोधित करताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सय्यद फेरोज , शेख अरबाज , शेख अदिल , सिद्दीकी अब्दूला , पठाण सैफ , अजीज अन्नान , सुनिल सातपुते , विजय रुसाने , मोमिन मुतालेब , अमजद शेख , फैजान काजी , सय्यद सद्दाम सह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks