इग्रंजी शाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाही शिक्षकदिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात यावेत – राम कटारे

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इग्रंजी शाळा आहेत याच इग्रंजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणारे शिक्षक जिवाचे राण करतांना दिसून येते, विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात चौकोनी चिऱ्या प्रमाणे घडविणारे असंख्य शिक्षक हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य करताना दिसतात. दिवसेंनदिवस इग्रंजी माध्यमाच्या शाळा उंच शिखरावर जाताना दिसुन येत आहे, मात्र या इग्रंजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या आदर्श, गुणवंत, अष्टपैलू शिक्षकांची शिक्षक दिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात यावी.
इग्रंजी माध्यमाच्या अनेक शाळेत उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक आहेत हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये पोहचण्यासाठी इग्रंजी शाळेतील शिक्षक कठोर मेहनत, परिश्रम घेतात अशा मेहनती अष्टपैलू शिक्षकांची शिक्षक दिनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा अशी मागणी राम कटारे यांनी केली आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि विशेष असते मुलांना यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षकांची खुप महत्त्वाची भूमिका बजावतो देशभरातील विविध शाळा महाविद्यालय या ठिकाणी विविध उपक्रम घेऊन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये विद्यार्थी हे शिक्षकांचे कौतुक करतात आणि शुभेच्छा आणि भेट वस्तू देऊन शिक्षकांचा सन्मान करतात.
शिक्षण क्षेत्रात आपले आयुष्य समर्पित करणारे स्त्री शिक्षणाचे उदगाते, स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व ज्ञान ज्योति सीवित्रीमाई फुले यानी दीनदलित, अशपृश, बहुजन समाजातील तळागाळातील सर्वाना शिक्षणासाठी प्रेरित करून शिक्षण दिले, शिक्षण घेण्याचा अधिकार एका विशिष्ट वर्गालाच होता परंतु महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी भारत देशात विविध शाळा सुरू करून सर्वांना शिक्षणाचे अमृत पाजले, स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क फक्त महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या महान कार्यामुळे मिळाला, शिक्षणासाठी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले, त्याच्या याच महान कार्याची दखल घेऊन २८ नोव्हेंबर हाच महात्मा फुले याचा स्मृती दिनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा व इंग्रजी शाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकलव्य संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख व पुरोगामी पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष राम कटारे यांनी केली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks