खरात आडगांव पंचक्रोशीतील जनता विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांकडे दाद मागणार ! : – संतोष रासवे

सतत गैरहजर राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशीची मागणी

माजलगांव / ( पृथ्वीराज निर्मळ )
तालूक्यातील खरात आडगांव येथील आरोग्य अधिकारी वैशाली घेवारे ह्या गेली कित्येक दिवासा पासून आरोग्य उपकेंद्र खरात आडगांव येथे गैरहरज आहेत त्यामुळे खरात आडगांव व आजूबाजुच्या परिसरातील रुग्णांना आरोग्य विषयक अडचणीचा सामना करावा लागत आहे . त्या अनुषंगाने खरात आडगांव चे रहीवासी असलेले निर्भिड पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष रासवे यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गित्ते यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. व गंगामसला येथील आरोग्य अधिकारी यांना घेवारे यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते . मात्र गिते यांनी आपल्याच सहकारी यांची बाजु घेऊन खोटा अहवाल सादर केला असल्याचे यावेळी संतोष रासवे यांनी सांगितले आहे . खरं पाहता घेवारे या रुजू झाल्या पासून नेहमीच गैरहजर राहात असलेल्या या आरोग्य उपकेंद्राचा कारभार केवळ एक कंम्पांवडर सांभाळत असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे . तरी सुद्धा जर वरिष्ठ अधिकारी असेच गैरवर्तन करत असतील तर मग खरात आडगांव सह पंचक्रोशातील हताश व हतबल झालेली जनता जाणार कुठे . “गांव शहाना कि स्वतःच्या सहकार्याची बाजू घेणार अधिकारी शहाना ” हे सिद्ध करण्यासाठी व गंगामसला येथील आरोग्य अधिकारी अन् जिल्हा आरोग्य अधिकारी हे दोघेही खरात आडगांवकरांना न्याय देवूच शकत नसल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या दरबारी जावून दाद मागणार असल्याचे संतोष रासवे यांनी सांगीतले आहे .

माजलगांव ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ . मधुकर घूबडे यांनी दिनांक १२ मे रोजी १२:४० वा. खरात आडगांव उपकेंद्र या ठिकाणी भेट देवून शहानिशा केली असता हे उपकेंद्र बंद असल्याचे निष्पन्न झाले आहे . तात्काळ पंचनामा करून नोटीस काढण्याचे आश्वासन यावेळी डॉ. घूबडे यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks