गायरान धारकांच्या न्यायीक हक्कासाठी रिपाईचा एल्गार मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला

शेकडो कार्यकर्त्यांसह महिला गायनधारकांचा समावेश

माजलगांव / ( पृथ्वीराज निर्मळ )

केंद्रीय मंत्री तथा सामाजीक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले व रिपाई चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून माजलगाव तहासिल कार्यालयावर दिनांक १५ जून २०२३ गुरुवार रोजी माजलगाव तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोर्चामध्ये असंख्य महिला गायनधारकांचा समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व रिपाईचे माजलगांव तालुकाध्यक्ष अविनाश जावळे यांनी केले असून. नवीन बस स्थानक माजलगाव येथून या मोर्चाची सुरुवात झाली.
या मोर्चातील घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला होता. भूमिहीन गायरान धारक महिला व पुरुषांनी घोषणा देत तहसील कार्यालय येथे आगमन केले व गायरान धारकांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन माजलगाव तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी बोलताना रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश जावळे म्हणाले की, राज्य सरकार भूमिहीन गायरानधारकांना जमिनीपासून व घरापासून बेघर करण्यासाठी नोटिसा देऊन अन्याय करत आहे . गायरान धारकांना देण्यात आलेल्या नोटीसांना तात्काळ स्थगिती देऊन निर्णय मागे यावा. बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा देण्यात यावी व त्यांच्या भावास शासकिय सेवेत समाविष्ट करण्यात यावे व तसेच कुटूंबीयांस ५० लाखाचा निधी महाराष्ट्र शासनाने तात्काळ द्यावा . या सह
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरीधारी तपघाले व मुंबई येथील कु. हिना मेश्राम यांच्या मारेक-यांचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून शासना मार्फत वकिलांची नियुक्ती करण्यात यावी व या सर्व प्रकणांची चौकशी सि.बी.आय. चौकशी करण्यात यावी .
अविनाश जावळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या यल्गार मोर्चास युवा नेते किशोर जावळे, युवराज शिंदे, राहूल वाघमारे, मधूकर साळवे, राजु तुपारे, बाळासाहेब जावळे, आशोक जाधव, सुनिल भिसे, रमेश डोंगरे, जेष्ठ नेते साहेबराव पोटभरे, हरिष जावळे, विजय डावरे, आण्णासाहेब माने, ओम सोनकांबळे, अशोक किर्ते, मिलिंद पोटभरे, सचिन गाडेकर , राहूल सिरसट, विनोद भालेराव, रावसाहेब साळवे, भैय्या साळवे सह शेकडो कार्यकर्ते व महीला गायरानधारकांचा समावेश होता .

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks