चिंचगव्हाण येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

चिंचगव्हाण येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण – ॲड. अमोल डोंगरे यांच्या हस्ते संपन्न

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ ) तालुक्यातील चिंचगव्हाण हे गाव फुले -शाहू – आंबेडकरी चळवळीचे केंद्र असून या गावामध्ये महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने आगळ्या – वेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. दिनांक ५ मे रोजी चिंचगव्हाण येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.

सकाळी १० वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे भुमीपुत्र तथा बहुजन समाज पार्टी, बीड जिल्हाध्यक्ष अॕड. अमोल डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमास त्रिसरण सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र डोंगरे, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, माजी अध्यक्ष बी.सी.डोंगरे, सदस्य केशर तरकसे, शारदा तांगडे, ज्ञानोबा वाघमारे, पत्रकार रतन डोंगरे, माजी उपसरपंच रमेश डोंगरे, संजय डोंगरे, किरण डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यक्रम त्रिसरण बुद्ध विहार चिंचगव्हाण येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून उपस्थित बौद्ध उपासक – उपासिकांच्या उपस्थितीत सार्वजनिक बुद्ध-धम्म-संघ वंदना घेवून वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील परमेश्वर वाघमारे, सत्यपाल डोंगरे, भारत डोंगरे, अतिष जाधव, मुरलीधर डोंगरे, सुर्यभान तरकसे, उत्तम डोंगरे, सिध्दार्थ वाघमारे, आण्णा डोंगरे, जयश्री वाघमारे, व्दारका डोंगरे, अनुराधा साळवे, सिमा डोंगरे, तारामती डोंगरे, पुष्पा डोंगरे, अयोध्या डोंगरे, तांगडे ताई सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks