जय मल्हार गणेश मंडळाच्या वतिने ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

रक्तदान

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध असल्याने सण साजरे करता आले नाहीत मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सण अगदी उत्साहात साजरा केले जात आहेत. सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करताना दिसून येत आहे . शहरातील जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीने दि.५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
गणेश उत्सवा निमित्त जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी जय मल्हार मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे उपसभापती अच्युतराव लाटे माजी नगरसेवक भागवत भोसले अविनाश बनसोडे, अशोक जाधव, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता येवले, यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार गणेश मंडळाचे अध्यक्ष अभिजीत जाधव, उपाध्यक्ष सार्थक सरवदे, सचिन गायकवाड, विश्वजीत जाधव भैय्या घुमरे, सावन राठोड, अभिषेक पराड बबलु गायकवाड माऊली कदम, ज्ञानेश्वर गाडेकर, शैलेश आबूज, वैष्णव मुळे, सागर जाधव, कार्तिक मत्रे, रोहित गिल्डा, गणेश उगले, पंकज कुंडकर, सुमित तांबोळे, रोशन गिल्डा, जीत गायकवाड, रोहित काळे, संग्राम टकले अदी गणेश मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks