जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपुर येथे शासन स्तरावरून नुकत्याच प्राप्त झालेल्या इंटरॲक्टिव्ह सिस्टीम चे उद्घाटन

उप संपादकीय

आज दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपुर येथे शासन स्तरावरून नुकत्याच प्राप्त झालेल्या इंटरॲक्टिव्ह सिस्टीम चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गुरुनाथ जी शिंदाळकर साहेब व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत तालुका शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री अनिलजी पागे साहेब तसेच ग्रामपंचायत शिवपूरच्या सरपंच माननीय सौ पाटील मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री नितेशजी कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रसंगी पंचायत समिती शिरूर अनंतपाळ अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारीमाननीय सौ मधुमती जोशी मॅडम ( प्रभारी केंद्रप्रमुख केंद्र रापका) माननीय श्री गोडसे साहेब प्रभारी (केंद्रप्रमुख केंद्र कांबळगा) माननीय श्री सुधीरजी कलुरे सर माननीय श्री लोखंडे सरमाननीय श्री सोनकांबळे सरमाननीय श्री सूर्यवंशी सर( सर्व BRC विषय तज्ञ पंचायत समिती शिरूर अनंतपाळ ) हे उपस्थित होते या इंटरॅक्टिव्ह सिस्टीम मुळे या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम विषयक ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन करणे तसेच स्वयं अध्ययन करण्यासाठी सहाय्यभूत अशा अनेक बाबींचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks