डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला लाईनमन चंद्रकांत मुंडे यांचा विरोध का?

बनसारोळा येथील महावितरण कार्यालयाचा ढिसाळ कारभार

केज / प्रतिनिधी तालुक्यातील बनसारोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त व भीम गायनाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाच्या वेळेस लाईट बंद करू नये, असे रीतसर निवेदन येथील ग्रामस्थ व भीमसैनिकांच्या आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने महावितरण कार्यालयास देण्यात आले होते. मात्र येथील लाईनमन चंद्रकांत मुंडे यांनी खोडसाळपणे जाणून बुजून लाईट बंद करून भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी जनतेस वेठीस धरून त्यांचे मन दुखावण्याचे काम केले आहे.

यामुळे चंद्रकांत मुंडे प्रती तीव्र पडसाद उमटत असून त्यांचे ताबडतोब निलंबन करण्यात यावे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज तालुक्यातील बनसारोळा येथील सर्व जाती धर्मातील लोक हे एकोप्याने राहतात व सर्व जाती-धर्माचे सण जयंती उत्सव व इतर कार्यक्रम सर्वधर्मसमभाव प्रमाणे एकोप्याने साजरे करतात या ठिकाणी एकोप्याचे दर्शन घडते. एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असल्यामुळे १४ एप्रिल पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास सुरुवात होते.

तसेच बनसारोळा ठिकाणी दि. २४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. व दुसऱ्या दिवशी दि. २५ एप्रिल रोजी भीम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दिवशी लाईट बंद न करण्यासाठी रीतसर निवेदन महावितरण कार्यालयास भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी जनते ने दिले होते. परंतु येथील महावितरण कार्यालयाचे लाईनमन चंद्रकांत मुंडे यांनी भीम गीतांच्या चालू असलेल्या कार्यक्रमांमध्ये लाईट बंद करून लाईनमन ड्युटीवर न थांबता दारू पिऊन शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन झोपण्याचे काम त्यांनी केले. लाईट बंद पडल्यामुळे भीमसैनिक महावितरण कार्यालयात गेले असता तेथील ऑपरेटर यांना लाईट बाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मी याबाबत काहीही करू शकत नाही हनुमान चौकातील फिडरला चंद्रकांत मुंडे हे आहेत याबाबत त्यांना तुम्ही विचारणा करा. भीमसैनिकांनी चंद्रकांत मुंडे यांना फोन वरून संपर्क साधला असता ते उद्धटपणे उत्तर देऊ लागले की, मी बाहेर आहे मी काहीही करू शकत नाही. लाईट कळंब वरूनच कमी करण्यात आलेली आहे. चंद्रकांत मुंडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी कर्तव्यावर न राहता दारू पिऊन एका गोठ्यात जाऊन झोपले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला बनसारोळा येथील लाईनमन चंद्रकांत मुंडे यांचा विरोध का? असा प्रश्न येथील भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी जनतेत उपस्थित होत आहे. यामुळे अशा या कर्तव्यहीन, जातीयवादी लाईनमन चंद्रकांत मुंडे यांच्या प्रति आंबेडकर प्रेमी जनतेमध्ये तीव्र पडसाद उमटत असून अशा या मगरुर लाईनमन चंद्रकांत मुंडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे येथील भीमसैनिक व आंबेडकरी जनतेतून बोलली जात आहे.

बनसारोळा येथील महावितरण कार्यालयामध्ये रात्रीच्या वेळी एक ही कर्मचारी उपस्थित नसतात. असे असताना देखील येथील ग्रामस्थ येथील कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. येथील ग्रामस्थ आपली काही तक्रार घेऊन गेले असता येथील महावितरणचे कर्मचारी हे येथील ग्रामस्थांना अरे- रावी करत हिन व तुच्छतेची वागणूक देतात. त्यांना व्यवस्थित बोलत नाहीत. समोरची व्यक्ती कोणीही असो याचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यांच्या विरोधात कोणी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते त्या व्यक्तीस जास्तच त्रास देतात. यांची वसुली मात्र कडक पण काम मात्र शुन्य. या कर्मचाऱ्यांच्या उलट्या बोंबा म्हणण्यास काही हरकत नाही. यामुळे बनसारोळा महावितरण कार्यालय चालते तरी कोणाच्या आशीर्वादाने असा प्रश्न येथी जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks