डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बळकट करण्यासाठी समाजाने जागरूक रहावे – विजय साळवे

माजलगाव ( वर्तमानमहाराष्ट्र )

तालुक्यातील बाभळगाव येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दि . २० रोजी सकाळी १० वाजता पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण सरपंच सत्वशीलाताई सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्वा.रि.प.चे नेते विजय साळवे आपल्या भाषणात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बळकट करण्यासाठी व त्यांनी सांगितलेल्या शिकवणी प्रमाणे वागून चळवळ सक्षम बनवण्यासाठी आंबेडकरी समाज व तरुण भीमसैनिकांनी कार्यकर्त्यांनी सजग राहून कार्य करावेआम्ही विद्यार्थी दशेपासून हाफ चड्डीतअसल्यापासून भारतीय दलित पॅंथरच्या चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध बंड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे त्या काळात कार्यकर्त्यांमध्ये समर्पण व त्याग करण्याची ताकद होती घरावर तुळशीपात्र ठेवून चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य अनेक भीमसैनिकांनी आपल्या त्यागातून केले.आत्ता सुद्धा काही चांगल्या प्रकारे काम करणारे कार्यकर्ते नेते युवक समाजात आहेत परंतु प्रामुख्याने शहरी भागातील काही लाचार कार्यकर्ते युवक खायला मटन दारू कबाब तंदुरी चिकन बिर्याणी कोण नेते देतात. त्याच्या नादी लागून समाजाला बदनाम करत आहेत काही नेते सुद्धा जाणीवपूर्वक तरुणांना आम्हीच दाखवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणाऱ्या पक्षात सुद्धा जाऊन तरुणांना अमिषे दाखवून समाजाचे वाटोळे करत आहेत.अशा गद्दार नेत्या पासून सावध राहिले पाहिजे असल्या स्वार्थी लोकांमुळेसमाज अधोगतिकडे जात आहे. आज सुद्धा समाजावरील अन्याय अत्याचार थांबलेली नाहीत आता जातीयवादी व्यवस्थेने आपल्यासमोर नवे प्रश्न उभे केले आहेत त्याचा तोडगा काढण्यासाठी समाजाने सच्चा भीमसैनिक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून चळवळ सक्षम बनवण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बळकट होती समाज सक्षम होईल या जयंती सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित लोकांसह माजलगाव लोकचे माजी बांधकाम सभापती राजेश साळवे वंचितचे अनिल डोंगरे, ब.स.पा.चे सिद्धार्थ टाकणखार, अॅड. अमोल डोंगरे, रिपब्लिकन सेनेचे अजय गोरे, ओम प्रकाश टाकणखार, विजय गायकवाड, मयूर कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विकास निकाळजे, सुरज निकाळजे, अमोल सोनवणे, देविदास सोनवणे अशोक निकाळजे अमर निकाळजे, अरविंद निकाळजे यांनी परिश्रम घेतले

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks