निर्भीड पत्रकार संघ बीड जिल्हा उपाध्यक्षपदी हमीद शेख यांची निवड

माजलगाव / प्रतिनिधी दि. १६ जानेवारी रोजी दैनिक सिटीजन कार्यालय बीड येथेनिर्भिड पत्रकार संघाची बिड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारीणी निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रसिंग ढाका अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून सर्वानुमते दैनिक आत्ताच एक्सप्रेसचे बीड जिल्हा निवासी संपादक शेख हमीद यांची निर्भीड पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी दैनिक सिटीजन चे मुख्य संपादक शेख मुजिब, जिल्हा कार्याध्यक्ष तथा दै. बीड प्रसारचे मुख्य संपादक समीर काझी यांच्या हस्ते पुष्पहार, व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा उपाध्यक्षपदी हमीद शेख यांना निवड झाल्याबद्दल पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पत्रकार पृथ्वीराज निर्मळ, पत्रकार नईम आतार, पत्रकार परमेश्वर सोळंके, पत्रकार संतोष रासवे, पत्रकार सिद्धेश्वर गायकवाड यांची उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks