न.प.च्या मालकिच्या ओपन स्पेस जागा हद्दबद्ध करून सिंदफणा नदिची पूर नियंत्रण रेषा कायम करा – विजय साळवे

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
माजलगाव शहराची वाढती लोकसंख्या व विकासाच्या दृष्टीने बीड-नगर रचनाकार कार्यालयाने तयार केलेल्या डि.पी. प्लॅनच्या नकाशाप्रमाणे नगर पालिकेच्या हद्दीतील ओपन प्लेसच्या जागेवर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेले आहेत. नियोजित विकास कामासाठी शहरातील ओपन जागांची चौकशी करून ज्या ज्या जागांवरील अतिक्रमणे झालेली आहेत, ती अतिक्रमणे तात्काळ हटवुन संबंधीतांवर व अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध योग्य गुन्हे दाखल करण्यात यावेत व ज्या उद्देशाने जागांचे आरक्षित केलेल्या आहेत ती विकास कामे तात्काळ करण्यात यावीत. तसेच शहरातील डि. पी. प्लेन प्रमाणे असणाऱ्या नियोजीत रस्त्यांवर सुध्दा फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असुन या सर्व गंभीर बाबीकडे न.प. प्रशासन व प्रशासक नजर अंदाज करत आहेत. माजलगाव शहर हे फार मोठ्या प्रमाणात झपाटयाने वाढत आहे. त्यात दोन हायवे शहरातुन गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरात मुख्य रस्ता एकच असल्याने शहरात येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे न.प. च्या हदीतील शहरा अंतर्गत रस्ते नगर रचनाकार यांनी तयार केलेले आहेत. त्या पैकी ९०% रस्त्यांवर शहरातील भूमाफीयांनी अतिक्रमणे केलेली आहेत. ती अतिक्रमणांची डि. पी. प्लॅन च्या नकाशा प्रमाणे चौकशी करून तात्काळ हटवून शहरातील जनतेचा दबलेला श्वास मोकळा करा म्हणजे आधुनिक माजलगाव शहर बनण्यासाठीचे महान कार्य होईल, तसेच शासनाने फंड देऊन सुध्दा न.प. प्रशासन विकास कामे करण्याची उदासिनता दाखवत आहे. याचे कारण आम्हाला समजलेले नाही. सर्व फंड दलित वस्त्यांच्या व नागरिकांच्या विकासासाठीच वापरण्यात यावा. गेल्या पाच वर्षा पासुन शहरातील दोन ठिकाणी दलित स्मशान भुमी साठी असणारा फंड उपलब्ध असताना देखील स्मशान भुमीचे काम अर्ध्यावर करून ठेवलेले आहे. यासंदर्भात सुध्दा तात्काळ लक्ष घालून संबंधित एजंशीकडून उर्वरित कामे तात्काळ करा नसता उर्वरित कामे इतर एजंशींना पाचारण करून तात्काळ कामे पूर्ण करण्यात यावेत तसेच शहरात विविध विकास योजना राबवण्यासाठी सर्व नं.३००, ३०१, ३०२ मध्ये एकूण १३ एकर जागा
तसेच सर्वे नं.३७२ मध्ये ३ एकर ३० गुंठे जमीन तात्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी साबळे यांनी वसंतराव देशमुख यांच्या मालकीची जमीन खरेदी-विक्री करून न. प. च्या नावे घेतलेली आहे. त्या सर्व जमीनींवर शहरातील भुमाफिया लोकांनी अतिक्रमने करून सदरिल न.प.च्या मालकीच्या जमीनी हडप करण्याचा डाव रचलेला आहे. त्या जमीनीची भुमीअभिलेख उपअधिक्षक कार्यालय, माजलगाव यांच्या मार्फत मोजणी करून त्या जमिनी नगर परिषदेने आपल्या ताब्यात घ्याव्यात व खरेदी-विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कार्यवाही करावी तसेच माजलगाव शहराच्या लगत सिंदफणा नदी आहे. वरती मोठे धरण आहे. माजलगाव शहराच्या लगत असलेले सिंदफणा नदीच्या पात्राजवळ भुमाफीयांनी शासनाची फसवणुक करून अकृषी परवाने चुकीच्या पद्धतीने काढून नदीच्या दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील फ्लड झोनमध्ये येणाऱ्या पुरनियंत्रण रेषेत येणाऱ्या जमीनीवर अतिक्रमणे करून जमीनीची प्लॉटींग केलेली आहे व त्याची खरेदी-विक्री सर्रास चालू आहे सदरिल फ्लड झोन जागेची खरेदी-विक्री तात्काळ थांबवून भविष्यात होणाऱ्या मोठ्ठा अनर्थ व मनुष्य हानीला टाळण्यासाठी सदरिल भुमाफीया ,अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी. आपणास दिलेल्या निवेदनाची रितसर चौकशी करून वरिल संदर्भाच्या अनुषंगाने
कार्यवाही येत्या ०७ दिवासात आपल्या कार्यालयामार्फत व्हावी. संदर्भात रास्त मागणी साठी दिलेल्या वेळेत कार्यवाही न झाल्यास, आपल्या कार्यालयासमोर संबंधित मागण्यांसाठी तिव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या वतीने दि. १५/११/२०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वा. बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.नपच्या मालकिच्या ओपन स्पेस जागा हद्दबद्द करून सिंदफणा नदिची पूर नियंत्रण रेषा कायम करा – विजय साळवे

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा !

माजलगाव / प्रतिनीधी
माजलगाव शहराची वाढती लोकसंख्या व विकासाच्या दृष्टीने बीड-नगर रचनाकार कार्यालयाने तयार केलेल्या डि.पी. प्लॅनच्या नकाशाप्रमाणे नगर पालिकेच्या हद्दीतील ओपन प्लेसच्या जागेवर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेले आहेत. नियोजित विकास कामासाठी शहरातील ओपन जागांची चौकशी करून ज्या ज्या जागांवरील अतिक्रमणे झालेली आहेत, ती अतिक्रमणे तात्काळ हटवुन संबंधीतांवर व अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध योग्य गुन्हे दाखल करण्यात यावेत व ज्या उद्देशाने जागांचे आरक्षित केलेल्या आहेत ती विकास कामे तात्काळ करण्यात यावीत. तसेच शहरातील डि. पी. प्लेन प्रमाणे असणाऱ्या नियोजीत रस्त्यांवर सुध्दा फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असुन या सर्व गंभीर बाबीकडे न.प. प्रशासन व प्रशासक नजर अंदाज करत आहेत. माजलगाव शहर हे फार मोठ्या प्रमाणात झपाटयाने वाढत आहे. त्यात दोन हायवे शहरातुन गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरात मुख्य रस्ता एकच असल्याने शहरात येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे न.प. च्या हदीतील शहरा अंतर्गत रस्ते नगर रचनाकार यांनी तयार केलेले आहेत. त्या पैकी ९०% रस्त्यांवर शहरातील भूमाफीयांनी अतिक्रमणे केलेली आहेत. ती अतिक्रमणांची डि. पी. प्लॅन च्या नकाशा प्रमाणे चौकशी करून तात्काळ हटवून शहरातील जनतेचा दबलेला श्वास मोकळा करा म्हणजे आधुनिक माजलगाव शहर बनण्यासाठीचे महान कार्य होईल, तसेच शासनाने फंड देऊन सुध्दा न.प. प्रशासन विकास कामे करण्याची उदासिनता दाखवत आहे. याचे कारण आम्हाला समजलेले नाही. सर्व फंड दलित वस्त्यांच्या व नागरिकांच्या विकासासाठीच वापरण्यात यावा. गेल्या पाच वर्षा पासुन शहरातील दोन ठिकाणी दलित स्मशान भुमी साठी असणारा फंड उपलब्ध असताना देखील स्मशान भुमीचे काम अर्ध्यावर करून ठेवलेले आहे. यासंदर्भात सुध्दा तात्काळ लक्ष घालून संबंधित एजंशीकडून उर्वरित कामे तात्काळ करा नसता उर्वरित कामे इतर एजंशींना पाचारण करून तात्काळ कामे पूर्ण करण्यात यावेत तसेच शहरात विविध विकास योजना राबवण्यासाठी सर्व नं.३००, ३०१, ३०२ मध्ये एकूण १३ एकर जागा
तसेच सर्वे नं.३७२ मध्ये ३ एकर ३० गुंठे जमीन तात्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी साबळे यांनी वसंतराव देशमुख यांच्या मालकीची जमीन खरेदी-विक्री करून न. प. च्या नावे घेतलेली आहे. त्या सर्व जमीनींवर शहरातील भुमाफिया लोकांनी अतिक्रमने करून सदरिल न.प.च्या मालकीच्या जमीनी हडप करण्याचा डाव रचलेला आहे. त्या जमीनीची भुमीअभिलेख उपअधिक्षक कार्यालय, माजलगाव यांच्या मार्फत मोजणी करून त्या जमिनी नगर परिषदेने आपल्या ताब्यात घ्याव्यात व खरेदी-विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कार्यवाही करावी तसेच माजलगाव शहराच्या लगत सिंदफणा नदी आहे. वरती मोठे धरण आहे. माजलगाव शहराच्या लगत असलेले सिंदफणा नदीच्या पात्राजवळ भुमाफीयांनी शासनाची फसवणुक करून अकृषी परवाने चुकीच्या पद्धतीने काढून नदीच्या दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील फ्लड झोनमध्ये येणाऱ्या पुरनियंत्रण रेषेत येणाऱ्या जमीनीवर अतिक्रमणे करून जमीनीची प्लॉटींग केलेली आहे व त्याची खरेदी-विक्री सर्रास चालू आहे सदरिल फ्लड झोन जागेची खरेदी-विक्री तात्काळ थांबवून भविष्यात होणाऱ्या मोठ्ठा अनर्थ व मनुष्य हानीला टाळण्यासाठी सदरिल भुमाफीया ,अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी. आपणास दिलेल्या निवेदनाची रितसर चौकशी करून वरिल संदर्भाच्या अनुषंगाने
कार्यवाही येत्या ०७ दिवासात आपल्या कार्यालयामार्फत व्हावी. संदर्भात रास्त मागणी साठी दिलेल्या वेळेत कार्यवाही न झाल्यास, आपल्या कार्यालयासमोर संबंधित मागण्यांसाठी तिव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या वतीने दि. १५/११/२०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वा. बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks