पात्रुड ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनास उपस्थित राहाण्याचे आहवान- एकनाथ मस्के

ग्रामस्थ प्रचंड वैतागले असून त्याला वाचा फोडण्यासाठी पात्रुड ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पात्रुड महावितरण कार्यालयाच्या समोर

माजलगाव / ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पात्रुड येथील महावितरण कंपनीकडुन ग्रामस्थांना विजेच्या बाबतीत प्रचंड त्रास दिला जात असुन याबाबत ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महाविरण कंपनीच्या विरोधात दि. २३ मे रोजी सकाळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येने मोठे असलेले पात्रुड गाव महावितरणच्या समस्या बाबत मागील अनेक दिवसांपासून महावितरण कंपनीच्या कार्यालयास निवेदन, उपोषण, रस्ता रोको करूनही विजेच्या समस्या संदर्भात वरिष्ठानकडून कोणतेही ठोस मार्ग काढले जात नसल्याकारणाने ग्रामस्थ प्रचंड वैतागले असून त्याला वाचा फोडण्यासाठी पात्रुड ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पात्रुड महावितरण कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा गावचे माजी सरपंच एकनाथ मस्के यांच्यासह शेकडो लोकांनी स्वाक्षरी करून वरिष्ठांना कळवले आहे.

त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत आर. डी. एस. एस. अंतर्गत गावठान फिडर योजनेस मंजुरी देऊन कामास तात्काळ सुरूवात करणे, गावात २२ स्ट्रक्चर आहेत त्यास ६६ डब्यांची आवश्यकता असुन सध्या ४९ डब्बे असल्याने सारखेच जळत आहेत म्हणून २५ चे नविन २० डब्बे द्यावेत, संपुर्ण गावात असलेल्या स्ट्रक्चरला नविन केबल व किटक्याट बसवावेत, स्ट्रक्चरच्या अर्थिंगचे काम करावे, जिर्न झालेल्या विद्युत वाहक तारा बदलाण्यात यावा, लोंबकाळणा-या तारांचा बंदोबस्त करावा, वाकलेल्या, क्रॅक पोलच्या जागी नविन पोल लावा, मिटर देण्यास विलंब लागत असुन कोटेशन धारक लोकांना तात्काळ मिटर द्यावे, अंदाजे बिल येत असल्याने त्याची दुरूस्ती करून कोटेशन धारकास बील कमी करून द्यावे, वाढत्या लोकसंख्येनुसार गावाला नविन तीन स्ट्रक्चरला मंजुरी द्यावी व शेतकऱ्यांना शेतातला ट्रान्सफॉर्म जळल्यानंतर २४ तासाच्या आत बदलून देण्यात यावा या मागण्यांसाठी पात्रुड येथील महावितरण कार्यालयासमोर मा. सरपंच एकनाथ मस्के, मा. सरपंच नजिर कुरेशी, मा.उपसभापती लतिफ मोमीन, मा.सरपंच जब्बार शेख, मा. उपसरपंच घनश्याम भुतडा, मा. उपाध्यक्ष ख. वि. संघ वहिद पटेल यांचेसह ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असुन ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks