पात्रुड जिल्हा परिषद शाळेची स्वच्छते विना दुरावस्था!

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील पात्रुड येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही पंचक्रोशीत नावाजलेली शाळा असून आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येथे येतात. पात्रुड हे गाव नॅशनल हायवे खामगाव पंढरपूर महामार्गावर वसलेले असून हे गाव बाजारपेठेच्या मानाने व लोकसंख्येच्या मानाने मोठे आहे. गावची लोकसंख्या देखील गावाच्या मानाने खूप मोठी असून. येथील गावची ग्रामपंचायत देखील मोठी आहे. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये सेवक ( शिपाई ) संख्या तीन असून हे शिपाई शाळेमध्ये वेळेवर हजर नसतात. शाळेमध्ये आले तर फक्त हजेरी लावण्यासाठी येतात. त्यांना शाळेची स्वच्छता ठेवण्यासाठी वेळच नसल्याचे दिसून येत आहे.

शाळेचे स्वच्छतागृह एकदम गहाण अवस्थेत असून त्याकडे मुख्याध्यापकाचे कसल्याही प्रकारचे लक्ष नाही.

पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरती घाणीचे साम्राज्य पसरलेले असून याकडे मुख्याध्यापक, ( शिपाई ) सेवक यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


शाळेचा परिसर एकदम गहाण असून जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. याकडे गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागास याकडे बघण्यासाठी वेळच नसल्याचे दिसून येते. शिक्षण विभागातल्या अशा या कर्मचाऱ्यांमुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक अशा साथीच्या रोगास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. येथील ( शिपाई ) सेवक हे एखाद्या जुन्या म्हणीप्रमाणे पाटलासारखे शाळेमध्ये येतात. शाळेची साफसफाई न करता मास्तरांच्या रुबाबाप्रमाणेच रुबाबात राहतात. व शाळा सुटल्यानंतर शाळेची स्वच्छता न करताच निघून जातात. या अशा शिपाया वरती मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा कसल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे शाळेचीदुरावस्था होत असून.

स्वच्छतेचे तीन तेरा नऊ बारा वाजले असून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पात्रुड या शाळेची स्वच्छते विना दुरावस्था झाली आहे.
काय ती शाळा, काय ते मास्तर, काय ती स्वच्छता, एकदम ओकेच हाय! असे म्हणण्याची वेळ पालकावर आली असून येथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. शिक्षण विभागाचे येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षण अधिकारी यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा पालकांच्या रोषास सामोरे जावे. असे येथील पालक वर्गातून बोलले जात आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks