पात्रुड येथील बस स्थानकावर झालेले अतिक्रमण तात्काळ काढा- मोमीन खलील

रस्त्यालगत अतिक्रमणे झाली असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते.

माजलगाव / (वर्तमान महाराष्ट्र ) तालुक्यातील पात्रुड हे गाव खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावर असून माजलगाव शहरापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर आहे. या गावांमध्ये रोड लगत अनेक अतिक्रमणे करण्यात आली असल्याकारणाने हमेशा येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. पात्रुड हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव असून येथील ग्रामपंचायत ही एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे.

येथील सरपंचांनी आदर्श पुरस्काराचा मान देखील मिळवलेला आहे. मात्र असे असून सुद्धा या ठिकाणी बस स्थानकाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी सुसज्ज असे बसस्थानक होते मात्र या परिसरातील शेतकऱ्यांनी बसस्थानकावर अतिक्रमण करीत त्यावर ताबा निर्माण करून त्या ठिकाणी दुकाने उभारली आहेत.

यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानक नाही. तर प्रवासी रोडवर उभे राहून बसची वाट पाहतात. यामुळे रस्ता जामची समस्या हमेशा निर्माण होऊन वाहतूक कोंडी हमेशा होते. एखादे वाहन भरधाव येऊन चालकाचा ताबा सुटला तर एखादा मोठा अपघात होऊ शकतो.किंवा हे वाहन एखाद्या दुकानात देखील घुसू शकते हे नाकारता येत नाही.

तसेच याच परिसरात सामायिक विहीर देखील होती अतिक्रमण धारकांनी ही विहीर गायब केली आहे. याबाबत वारंवार तक्रार निवेदने करून तीन तीन महिने झाले तरी पण याविषयी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलीच कारवाई झाली नाही. त्यांनी याबाबत पत्र पण काढले नाही व कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.

यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीची टाळाटाळ केली जाते. अशा एक नव्हे अनेक तक्रारदारांच्या तक्रारीची दखल न घेता तक्रारदाराच्या तक्रारींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली दाखवली जाते. व तक्रारदारांना मानसिक त्रास दिला जातो. तर तीन तीन महिने पत्र देखील काढले जात नाही. याच कारणास्तव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते.

बऱ्याचश्या तक्रारदारांना न्याय मिळत नसल्यामुळे आयुक्तांकडे यावे लागते. याचाच एक भाग म्हणून पात्रुड येथील रस्त्याला लागून असलेली अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावी व आपल्या स्तरावर कारवाई करून न्याय देण्यात यावा. असे तक्रारदार मोमीन खलील अब्दुल रशीद यांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks